Join us

जॉन अब्राहमने सुरु केलं शाहरुख खानच्या 'पठाण' सिनेमाचे शूटिंग, सेटवरचा फोटो झाला लीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 17:29 IST

John abraham picture leaked from pathan film set : पठाण सिनेमात शाहरुखसोबत जॉन आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

यशराज फिल्म्सच्या 'धूम' मध्ये 17 वर्षांपूर्वी व्हिलनची भूमिका साकारणारा जॉन अब्राहम पुन्हा एकदा यश राज फिल्म्सच्या सिनेमात व्हिलनची भूमिका साकारणार आहे.  'पठाण' चित्रपटाच्या सेटवरुन बाहेर पडतनाचा जॉनचा  पहिला फोटो समोर आला आहे. अमर उजालाच्या रिपोर्टनुसार जॉनचा हा फोटो पठाणच्या सेटवरचाच आहे. याचा अर्थ जॉनने पठाण सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. जॉनच्या शाहरुख खानचा सिनेमातील लूकदेखील लीक झाला होता. यशराजने शाहरूखला ‘पठाण’ या सिनेमासाठी 100 कोटी रूपये दिल्याचे कळतेय.‘पठाण’ने 100 कोटींचा बिझनेस केला तर शाहरूख त्यातून 45 कोटी रूपये घेणार अशीही एक चर्चा आहे.

पठाण सिनेमात शाहरुखसोबत जॉन आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शाहरुख या चित्रपटात एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. दीपिका देखील एका एजंटच्या भूमिकेत असणार असून ती शाहरुख खानसोबत मिशनवर काम करते असे या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या पात्रासाठी अनेक लूकचा विचार केला गेल्यानंतर अखेर दीपिकाच बॉय कटसाठी (शॉर्ट हेअर) तयार झाली. त्यामुळे या सिनेमात दीपिका शॉर्ट हेअरमध्ये दिसणार आहे. यशराज बॅनरचा ‘पठाण’ सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित करतोय.

‘पठाण’ या चित्रपटातील काही दृश्यांचे चित्रीकरण जगातील सर्वात मोठी इमारत म्हणून ओळखल्या जाणा-या बुर्ज खलिफामध्ये झाले आहे. यापूर्वी अनेक चित्रपटांमध्ये बुर्ज खलिफा बाहेर दाखवण्यात आला आहे.  

टॅग्स :जॉन अब्राहमशाहरुख खानदीपिका पादुकोण