Join us

JNU Attack: #BoycottChhapaak, चित्रपट समीक्षकाने देखील दीपिका पदुकोणवर साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 11:47 IST

एकीकडे ट्विटरवर #BoycottChhapaak हॅशटॅग ट्रेंड होतो आहे. तर आता चित्रपट समीक्षकदेखील दीपिकावर टीका केली आहे.

जेएनयू हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरात आंदोलन होत आहेत. इतकेच नाही तर बॉलिवूडचे कलाकारदेखील हल्ल्याचा निषेध व्यक्त करत आहेत. यादरम्यान अभिनेत्री दीपिका पदुकोण विद्यार्थ्यांना पाठींबा देण्यासाठी जेएनयूला पोहचली होती आणि तिथे दहा मिनिटं काहीच न बोलता तिथून निघून गेली. मात्र यावरून सोशल मीडियावर दीपिकाला ट्रोल करण्यात येत आहे. ट्विटरवर #BoycottChhapaak हॅशटॅग ट्रेंड होतो आहे. त्यात आता चित्रपट समीक्षकदेखील दीपिकावर टीका केली आहे.

चित्रपट समीक्षक सुमीत कडेलने दीपिका पदुकोण जेएनयूला विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी गेले म्हणून तिच्यावर निशाणा साधला आहे. सुमीतने त्याचा जुना ट्विट रिट्विट करत लिहिले की, पद्मावतच्या वेळी तू योग्य होती आणि तुम्हाला पाठिंबा दिला होता. मात्र तुकडे तुकडे गँगसोबत सहभागी होऊन तू देशाच्या भावना दुखावल्या आहेस.

सुमीत कडेलने ट्विटरवर देशाला तोडणाऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या अभिनेत्रीच्या सिनेमाचे परीक्षण करणार नसल्याचे ट्विटरवर सांगितलं. त्याने ट्विट केले की,मी अशा अभिनेत्रीचा कोणताही सिनेमा पाहणार नाही जी अशा लोकांसोबत स्टेज शेअर करते जे देश तोडण्याच्या घोषणा देतात.देशाच्या गद्दारांसोबत आपल्या चित्रपटांचे प्रमोशनसाठी उभी राहिली. तिचा चित्रपट पाहणे लज्जास्पद ठरेल. शेम ऑन दीपिका पदुकोण

हल्ल्यामध्ये जखमी झालेली जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आइशी घोषला भेटली व कन्हैया कुमारच्या नेतृत्वामध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला सपोर्ट केला. दीपिकाच्या उपस्थितीत कन्हैया कुमारने जय भीम, जय भगत सिंगचे नारे लावले. दीपिका आंदोलनात जवळपास १० मिनिटं सहभागी झाली आणि काहीही न बोलता तिथून निघून गेली.  

टॅग्स :दीपिका पादुकोणछपाकजेएनयू