Join us

विराट कोहलीच्या बायोपिकमध्ये जितू भैय्या? चाहत्याच्या कमेंटवर 'पंचायत' फेम जितेंद्र कुमार म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 11:21 IST

चाहत्यांच्या या इच्छेवर जितेंद्रने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

'कोटा फॅक्टरी', 'पंचायत' या सीरिजमुळे अभिनेता जितेंद्र कुमार (Jitendra Kumar) प्रसिद्धीझोतात आला. जितू भैय्या, सचिवजी या भूमिकांनी त्याला कमालीची ओळख मिळवून दिली. आज जितू ओटीटीवरचा स्टार अभिनेता आहे. त्याच्या सीरिजमधील अनेक मीम्स, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यातच एक व्हिडिओ विराट कोहलीबाबतीत आहे. जितेंद्र कुमारने विराट कोहलीचा (Virat Kohli) बायोपिक करावा अशी अनेक चाहत्यांनी कमेंट केली आहे. यावर आता जितेंद्रने भावना व्यक्त केल्या आहेत.

'फिल्मीग्यान'ला दिलेल्या मुलाखतीत जितेंद्र कुमार म्हणाला, "मी बऱ्याच ठिकाणी चाहत्यांची ही कमेंट वाचली. आशा आहे विराट कोहलीवर सिनेमा बनेल आणि बनलाही पाहिजे. अनेकांना त्यामुळे प्रेरणाही मिळेल.  त्यांचा एवढा चांगला आणि इंटरेस्टिंग प्रवास राहिला आहे. त्याने आपल्या क्रिकेट करिअरमध्ये प्रत्येक मैलाचा दगड पार केला आहे. वैयक्तिक आयुष्यातही ते यशस्वी झाले. त्यामुळे नक्कीच त्याच्यावर बायोपिक आली पाहिजे. मी त्यांचा प्रवास जवळून पाहिला आहे. त्यामुळे मला जर बायोपिक करण्याची संधी मिळाली तर मी खूप खूश होईन."

जितेंद्रच्या चाहत्यांनी तर विराटच्या बायोपिकसाठी त्याची निवड केली. मात्र नेटकऱ्यांनी शाहीद कपूर जास्त परफेक्ट असेल अशा कमेंट्स केल्या. जितेंद्र खूप चांगला अभिनेता आहे मात्र त्याचा फिटनेस आणि उंचीमुळे तो विराटच्या बायोपिकसाठी परफेक्ट नाही असं अनेकांनी मत व्यक्त केलं. 

जितेंद्र कुमार टीव्हीएफ मुळे स्टार झाला. 'कोटा फॅक्टरी','पंचायत' ,'पिचर्स' या सीरिजमुळे तो लोकप्रिय झाला. याशिवाय त्याने 'जादूगार','शुभमंगल जादा सावधान' या सिनेमांमध्येही काम केलं. 

टॅग्स :विराट कोहलीसेलिब्रिटीबॉलिवूडआत्मचरित्र