Join us

जितेंद्र आव्हाड यांच्या लक्षात आला सुशांतच्या मृत्यूपूर्वीचा विचित्र योगायोग, 'ते' चित्र ट्विट केलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 15:47 IST

सुशांत सुमारे दीड वर्ष तणावात होता. त्यावर उपचारही चालू होते. याची प्रचिती त्याच्या सोशल मीडिया पोस्ट व ट्विटर होम पेजवरून येत होती.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी सुशांत स्वतःचे आयुष्य संपवले. त्याच्या निधनाने चाहत्यांसोबतच कलाकरांनीही मोठा धक्का बसला आहे. ऐन यशाच्या शिखरावर असताना सुशांतने आत्महत्या का केली? या विषयीचे तर्कवितर्क लावले जात आहेत. अशात आता आणखीन एका गोष्टींवर जोरदार चर्चा रंगली आहे.  

अशात  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेले ट्विटही व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या ट्विटमध्ये त्यांनी एक गोष्ट निदर्शनास आणून दिली आहे. त्यांनी लिहीले की, मी सुशांत सिंह राजपूतच्या ट्विटर प्रोफाईलवर नजर टाकली. सुशांतने ट्विटर अकाउंटच्या होम पेजवर नेदरलँडचे प्रसिद्ध चित्रकार विन्सेट वॅन गॉगचे प्रसिद्ध पेंटिंग “स्टार नाइट’ ठेवले होते. 

धक्कादायक बाब म्हणजे  गॉग यांनी 1890 मध्ये वयाच्या 37 वर्षी गोळी झाडून आत्महत्या केली होती. तेव्हा त्याने ट्विटरची कव्हर इमेज म्हणून एक पेटिंग ठेवले आहे. Starry Nights असे या पेटिंगचे नाव असून ते व्हिन्सेट व्हॅन गॉघ यांनी १८८९ मध्ये चितारले होते. त्यावेळी गॉघ हे नैराश्यामुळे मनोरुग्णालयात होते. यानंतर १८९० साली व्हिन्सेट गॉघ यांनी आत्महत्या केली.

सुशांत सुमारे दीड वर्ष तणावात होता. त्यावर उपचारही चालू होते. याची प्रचिती त्याच्या सोशल मीडिया पोस्ट व ट्विटर होम पेजवरून येत होती. त्याने वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या मनातील ही वेदना शब्दांतून जाहीर केली होती.

टॅग्स :जितेंद्र आव्हाडसुशांत सिंग रजपूत