Join us
Daily Top 2Weekly Top 5

जिया शंकरने रितेश-जिनिलियाचं केलं कौतुक, म्हणाली, "माझी आई आजारी असताना..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 16:29 IST

जियाने रितेश-जिनिलियाच्या 'वेड' सिनेमात भूमिका साकारली होती.

जिया शंकर (Jia Shankar) अभिनेत्रीला सगळेच 'वेड' मराठी सिनेमामुळे ओळखतात. यामध्ये जिया शंकरने रितेशच्या  गर्लफ्रेंडची भूमिका साकारली. त्यांची केमिस्ट्री चांगलीच गाजली. जिया शंकर मुंबईचीच असून काही दिवसांपूर्वी तिने तिच्या आईची तब्येत बरी नसल्याचं ट्वीट केलं होतं. तसंच चाहत्यांना आईसाठी प्रार्थना करा असंही म्हटलं होतं. जियाच्या या कठीण प्रसंगात रितेश-जिनिलियाने (Riteish-Genelia) तिला संपर्क केला होता. याविषयी जिया काय म्हणाली?

'पिंकव्हिला'ला दिलेल्या मुलाखतीत जिया शंकर म्हणाली, "मध्यंतरी माझी आई रुग्णालयात होती मी त्याबद्दल ट्वीट केलं होतं. मी तेव्हा खूप खचले होते. औषधं नाही तर प्रार्थना कामी येईल असं मला वाटत होतं. म्हणून मी ट्वीट करत सर्वांना प्रार्थना करण्याची विनंती केली होती. ते ट्वीट खूप व्हायरल झालं होतं आणि अनेक लोकांपर्यंत पोहोचलं होतं. रितेश-जिनिलियानेही ते कदाचित पाहिलं."

ती पुढे म्हणाली, "जिनिलियाने मला फोन केला. ती खूपच गोड व्यक्ती आहे. कपल म्हणून ते दोघंही एक नंबर आहेत आणि माणूस म्हणून तर अप्रतिमच आहेत. जिनिलिया आणि रितेश दोघंही माझ्याशी फोनवर बोलले आणि काहीही गरज लागली तर सांग असंही ते मला म्हणाले. खरोखरंच त्यांची तुमच्याशी मैत्री असणं ही भाग्याचीच गोष्ट आहे."

आता आईची तब्येत सुधारली असल्याचं जिया म्हणाली. तसंच 'वेड' सिनेमामुळे नशीब बदललं. आयुष्यात सकारात्मक वळण आलं. अनेक लोक मला ओळखू लागले ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे असंही ती म्हणाली. जिया लवकरच एका तमिळ सिनेमात दिसणार आहे. 

टॅग्स :मराठी अभिनेतामराठी चित्रपटरितेश देशमुखजेनेलिया डिसूजा