Join us
Daily Top 2Weekly Top 5

लवकरच ५०वा दिवस! 'झिम्मा २'च्या सक्सेसने भारावून गेला हेमंत ढोमे, म्हणाला - हिंदी-इंग्रजी सिनेमे आले आणि गेले, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 15:06 IST

२४ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेला 'झिम्मा २' सहा आठवड्यांनंतरही सिनेमागृहात ठाण मांडून बसला आहे. सिनेमाचं हे यश पाहून हेमंत ढोमेही भारावून गेला आहे.

हेमंत ढोमे हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. त्याने दिग्दर्शित केलेला 'झिम्मा २' हा सिनेमा नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित झाला. सात बायकांच्या रियुनियनची गोष्ट सांगणाऱ्या 'झिम्मा २ने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. २४ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेला 'झिम्मा २' सात आठवड्यांनंतरही सिनेमागृहात ठाण मांडून बसला आहे. सिनेमाचं हे यश पाहून हेमंत ढोमेही भारावून गेला आहे. हेमंतने याबाबत एक खास पोस्ट शेअर केली आहे. 

'झिम्मा २'ला प्रेक्षकांचं अतोनात प्रेम मिळत आहे. 'झिम्मा २'साठी हेमंतने त्याच्या सोशल मीडियावरुन खास पोस्ट शेअर केली आहे. हेमंतने झिम्मा २चा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. तो म्हणतो, "उद्यापासून आपला ७वा आठवडा, आज चित्रपटगृहात आपले ४२ दिवस पूर्ण…लवकरच ५० वा दिवस! हिंदी इंग्रजी सिनेमे आले आणि गेले पण या गर्दीत आपला मराठी सिनेमा…आपला 'झिम्मा २' टिकला तो केवळ तुमच्या प्रेमामुळेच! नुसता टिकला नाही तर त्याचा आनंद सोहळा झाला… खूप खूप धन्यवाद!"

हेमंत ढोमे दिग्दर्शित २०२१ साली प्रदर्शित झालेल्या 'झिम्मा' या सिनेमाचा 'झिम्मा २' हा सीक्वल आहे. या सिनेमात सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे, निर्मिती सावंत, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सुहास जोशी, सिद्धार्थ चांदेकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. 

टॅग्स :सिनेमासिद्धार्थ चांदेकरसेलिब्रिटीसायली संजीव