Join us

सोनमच्या लग्नात आई श्रीदेवीच्या 'या' गाण्यांवर डान्स करणार जान्हवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 10:57 IST

आता संगीतची जोरदार तयारी सुरु आहे. या सोहळ्यात बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचे डान्स परफॉर्मन्स होणार आहेत. यात जान्हवी कपूरचाही समावेश आहे. 

मुंबई : सोनम कपूरच्या लग्नाची चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये रंगली आहे. येत्या 8 तारखेला सोनम कपूरचं लग्न होणार असल्याची अधिकृत माहिती आहे. इतकेच नाहीतर अनिल कपूर यांनी मुलीच्या लग्नासाठी घर रंगीबेरंगी लाईट्ने सजवलं आहे. आता संगीतची जोरदार तयारी सुरु आहे. या सोहळ्यात बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचे डान्स परफॉर्मन्स होणार आहेत. यात जान्हवी कपूरचाही समावेश आहे. 

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, जान्हवी कपूर सुद्धा या डान्स करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जान्हवी तिची आई दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या गाण्यावर डान्स करणार आहे. ती श्रीदेवी यांच्या दोन गाण्यावर डान्स करणार आहे. त्यात 'मेरे हांथो मे नौ नौ चुडीयां' आणि 'ना जाने कहां से आयी हैं' या दोन गाण्यांता समावेश आहे. 

यासोबतच या संगीत सोहळ्यात अभिनेता रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर हे दोघे अनिल कपूर यांच्या काही खास गाण्यावर डान्स करणार आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जान्हवी कपूर आणि श्रीदेवी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत श्रीदेवी या जान्हवी बोलत असलेल्या मोडक्या तोडक्या हिंदी भाषेची गंमत करताना दिसत आहे.

टॅग्स :जान्हवी कपूरबॉलिवूड