Join us
Daily Top 2Weekly Top 5

"शाहरुख खान सिनेमाचा देव आहे", कंगनाकडून 'जवान'च्या टीमचे कौतुक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 09:38 IST

शाहरुख खानच्या 'जवान' सिनेमाच्या रिलीजच्या निमित्ताने कंगनाने या सिनेमाचे खूप कौतुक केले आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) बहुप्रतिक्षित सिनेमा 'जवान' (Jawan) आज रिलीज झाला आहे. चाहत्यांनी फर्स्ट डे फर्स्ट शो बघत थिएटरबाहेर जल्लोष केला. शाहरुखची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दरम्यान, बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौत अनेकदा इतर स्टार्सवर हल्लाबोल करताना दिसते. तिच्याकडून एखाद्या अभिनेत्याची किंवा त्याच्या चित्रपटाची स्तुती करणे फार कमी वेळा घडते. मात्र, शाहरुख खानच्या 'जवान' सिनेमाच्या रिलीजच्या निमित्ताने कंगनाने या सिनेमाचे खूप कौतुक केले आहे. तसेच, विशेष म्हणजे, कंगनाने शाहरुख खानला सिनेमामधील देव असल्याचे म्हटले आहे.

शाहरुख खानचा 'जवान' हा सिनेमा आज थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून कंगनाने 'जवान' रिलीजच्या पहिल्या दिवशी आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. 'जवान'साठी तिने शाहरुख खानसह सिनेमाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे. 'जवान' सिनेमाचे पोस्टर शेअर करताना कंगनाने एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. ती म्हणाली, "नव्वदच्या दशकातील अत्यंत प्रेमळ मुलगा असण्यापासून ते चाळीसच्या दशकाच्या उत्तरार्धात ते पन्नासच्या दशकात आणि जवळजवळ 60 वर्षांपर्यंतच्या प्रेक्षकांशी त्याचे नाते पुन्हा शोधण्यासाठी एक दशकाचा मोठा संघर्ष. खऱ्या अर्थाने सर्वोत्तम भारतीय अभिनेत्यांपैकी एक म्हणून उदयास येण्यासाठी आयुष्य एखाद्या महानायकापेक्षा कमी नाही."

याचबरोबर, कंगनाने पुढे लिहिले, "मला आठवते, एक काळ असा होता जेव्हा लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याच्या निवडीची खिल्ली उडवली, परंतु दीर्घ कारकीर्दीचा आनंद लुटणाऱ्या सर्वांसाठी त्याचा संघर्ष धडा ठरला. कलाकारांसाठी एक मास्टर क्लास, परंतु त्यांना स्वतःला पुन्हा शोधून पुन्हा स्थापित करावे लागेल." दरम्यान, कंगना इतक्यावरच थांबली नाही, तर तिने पुढे लिहिले की, "शाहरुख खान हा सिनेमाचा देव आहे, ज्याच्या सिनेमाला केवळ मिठी किंवा डिंपल्ससाठीच नाही तर काही जग वाचवण्यासाठीही आवश्यक आहे. किंग खान, तुझ्या जिद्द, मेहनत आणि सभ्यतेला सलाम."

दरम्यान,'पठाण'नंतर शाहरुखच्या 'जवान'ची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. 'जवान'मधील शाहरुखचे लूक पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली होती. अनेक कारणांबरोबर या सिनेमाचे  दिग्दर्शन साऊथचे प्रसिद्ध  दिग्दर्शक अ‍ॅटलीने केले आहे. अ‍ॅटली हा साऊथमधील मोस्ट डिमाडिंग दिग्दर्शकांपैकी आहे. याशिवाय, 'जवान' सिनेमात शाहरुख खानसह नयनतारा आणि विजय सेतुपथी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

टॅग्स :शाहरुख खानकंगना राणौतजवान चित्रपट