Join us

Javed Akhtar : RSS विरोधातील वक्तव्य भोवले, जावेद अख्तर यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 09:10 IST

ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानावरुन त्यांना मुलुंड दंडाधिकारी न्यायालयाकडुन समन्स पाठवण्यात आले आहे.

Javed Akhtar : ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तजर यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानावरुन त्यांना मुलुंड दंडाधिकारी न्यायालयाकडुन समन्स पाठवण्यात आले आहे. २०२१ मध्ये जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीत तालिबानी (Taliban) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित (RSS) वक्तव्य केले होते तेच त्यांना भोवले आहे. अफगाणिस्तान (Afganistan) मध्ये तालिबानी सत्तेत आल्यानंतर जावेद अख्तर यांनी तालिबान्यांची तुलना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी केली होती. 

संघाचे समर्थक वकील संतोष दुबे यांनी अख्तर यांच्याविरोधात टिप्पणी केली आहे. अख्तर यांनी राजकीय फायद्यासाठी संघाचे नाव नाहक यामध्ये ओढले असे म्हणले आहे. सर्वांना कल्पना आहे की तालिबानी आणि आरएसएस यांच्या विचारात काहीच साम्य नाही. मात्र केवळ आरएसएसला आणि माझ्यासारख्या स्वयंसेवकांना बदनाम करायचे, प्रतिमा मलीन करायची या उद्देशाने त्यांनी हे विधान केले आहे. 

याप्रकरणाची दखल घेत मुलुंड दंडाधिकारी न्यायालयाने जावेद अख्तर यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ६ जानेवारी मंगळवारी मुलुंड न्यायालयात सुनावणी होणार आहे. 

टॅग्स :जावेद अख्तरन्यायालयराष्ट्रीय स्वयंसेवक संघतालिबान