जास्मीन भसीन ‘बिग बॉस 14’मुळे कधी नव्हे इतकी चर्चेत आली. याच घरात जास्मीनला एकीकडे प्रेम मिळाले आणि दुसरीकडे रूबीना दिलैकसारखी ‘शत्रू’. होय, खरे तर रूबीना व जास्मीन आधी चांगल्या मैत्रिणी होत्या. पण शो जसाजसा पुढे गेला तशी तशी दोघींमधील मैत्रीत इतकी कटुता आली की, शो संपला तरी ही कटुता संपण्याची चिन्हं नाहीत. होय, तूर्तास सोशल मीडियावर याचा प्रत्यय येतोय आणि यानिमित्ताने रूबीना व जास्मीनच्या चाहत्यांमध्ये ‘वॉर’ सुरु झाले आहे.
या ट्विटमध्ये जास्मीनने कोणाचाही नामोल्लेख केलेला नाही. पण तिचा निशाणा अचूक जागी लागला. अर्थात या निगेटीव्ह पोस्टमुळे जास्मीनला ट्रोलही व्हावे लागले. अनेक युजर्सनी या निगेटीव्ह पोस्टसाठी जास्मीनला चांगलेच फैलावर घेतले.
मुली, तुझ्या मनात किती द्वेष भरलेला आहे. बिग बॉस संपला आहे. आता तरी त्यातून बाहेर पड आणि रूबीनाला टोमणे मारणे बंद कर, असे एका युजरने जास्मीनला सुनावले. तुझ्याकडे कोणते काम नाही का? जस्ट मुव्ह आॅन, असे एकाने तिला सुनावले. लोकांचा हेवा करणे बंद कर, नाहीतर तुझीच नौका डुबेन, असे एका युजरने तिला ट्रोल करताना लिहिले.