Join us
Daily Top 2Weekly Top 5

जान्हवी कपूर दर महिन्याला 'बॉयफ्रेंड'सोबत करायची ब्रेकअप! पुन्हा 2 दिवसांनी स्वत:चं म्हणायची Sorry, जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 11:30 IST

जान्हवीनं डेटिंग लाईफ आणि ब्रेकअपवर भाष्य केलं.

बॉलिवूडमध्ये नाती बनतात आणि तुटतात हे सामान्य आहे. अनेक सेलिब्रिटी आपलं नातं तुटल्यानंतर कोलमडून जातात. अभिनेत्री जान्हवी कपूरनेही तिच्या ब्रेकअपचे दुःख अनेकदा व्यक्त केले आहे. जान्हवी सध्या शिखर पहाडियाला डेट करत आहे. दोघेही नेहमी एकमेकांसोबत स्पॉट होतात. शिखरआधी जान्हवीने इतरही काही जणांना डेट केलं आहे. नुकतेच एका मुलाखतीमध्ये जान्हवीनं डेटिंग लाईफ आणि ब्रेकअपवर भाष्य केलं. 

जान्हवी कपूरने डेटिंग लाइफबद्दल बोलताना सांगितले की, ती दर महिन्याला तिच्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप करायची. ती म्हणाली, 'माझं पहिलं ब्रेकअप फारसं वाईट नव्हतं. कारण तो माझ्याकडे परत आला होता. हार्ट ब्रेक झालं होतं. पण,  ती व्यक्ती परत आली आणि सर्व काही ठीक झालं'.

जान्हवी कपूर पुढे म्हणाली, 'मी दर महिन्याला बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप करायची आणि मीच परत दोन दिवसांनी रडत जाऊन सॉरी म्हणायची.  माझ्या मासिक पाळीच्या पहिल्या काही वर्षांमध्ये दर महिन्याला माझं ब्रेकअप व्हायचं. मी सारखं ब्रेकअप करत असल्याने त्याला सुरुवातीला थोडा धक्का बसायचा. पण, मग त्यालाही सवय झाली'. 

जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड शिखर पहाडिया हा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. बऱ्याच वर्षांपासून जान्हवी आणि शिखर एकमेकांना डेट करत आहे. मधल्या काळात जान्हवीच्या बॉलिवूड पदार्पणाआधीच त्यांचं ब्रेकअप झालं होतं. मात्र शिखरकडून नातं संपलं नव्हतं. तो तरीही जान्हवीची वाट पाहत होता असं स्वत: जान्हवीने सांगितलं होतं. नंतर दोघं पुन्हा एकत्र आले. आता दोघंही सार्वजनिक ठिकाणीही हातात हात घालून येतात. 

दरम्यान, जान्हवी 'उलझ' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या २ ऑगस्ट २०२४ रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. शिवाय जान्हवी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात दिसली होती. लग्नानंतर अभिनेत्रीला अन्नातून विषबाधा झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जान्हवीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.  

टॅग्स :जान्हवी कपूरसेलिब्रिटीबॉलिवूडदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट