Join us
Daily Top 2Weekly Top 5

जान्हवी कपूर कालपासून रुग्णालयात, अभिनेत्रीला नक्की झालं काय? बोनी कपूर म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 09:58 IST

तब्येत बिघडल्याने कालच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सध्या रुग्णालयात अॅडमिट आहे. तब्येत बिघडल्याने कालच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिला दोन दिवसांपासूनच अस्वस्थ वाटत होते. आधी अंबानींच्या प्रत्येक फंक्शनला तिने ग्लॅमरस लूकमध्ये हजेरी लावली. नंतर तिच्या आगामी 'उलझ' सिनेमाच्या ट्रेलर लाँचला ती पोहोचली. या सर्व धकाधकीत तिच्या तब्येतीवर परिणाम झाला. जान्हवीला नक्की झालं काय याची माहिती नुकतीच बोनी कपूर यांनी दिली.

Etimes शी बोलताना बोनी कपूर म्हणाले, "जान्हवी आणखी १-२ दिवस हॉस्पिटलमध्येच असेल. उलझ सिनेमाच्या ट्रेलर लाँचसाठी ती चेन्नईला गेली होती. तिथून मुंबई येताच तिच्या खाण्यात काहीतरी आलं असावं. ज्यामुळे तिला गंभीर स्वरुपाचं फूड पॉयझनिंग झाले. यामुळेच आम्ही तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. उद्यापर्यंत तिला डिस्चार्ज मिळेल. "

जान्हवीच्या टीमने अद्याप कोणतंही स्टेटमेंट जारी केलेले नाही. आगामी 'उलझ' सिनेमाच्या रिलीजसाठी जान्हवी उत्सुक आहे. २ ऑगस्टला सिनेमा रिलीज होतोय. यामध्ये तिने इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ऑफिसरची भूमिका साकारली आहे. यंग डिप्लोमेट सुहाना असं तिचं कॅरेक्टरचं नाव आहे. तिच्याच भोवती सिनेमाची कथा फिरते. नुकताच सिनेमाचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. 

टॅग्स :जान्हवी कपूरबोनी कपूरबॉलिवूडहॉस्पिटलअन्नातून विषबाधा