Join us

‘जमाई राजा’च्या ‘या’ अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, अमरनाथ यात्रेदरम्यान वडिलांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 14:35 IST

‘जमाई राजा’फेम अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अमरनाथ यात्रेवर गेलेल्या तिच्याच्या वडिलांचा अचानक मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देशाइनी दोशीने 2013मध्ये संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सरस्वतीचंद्र’ या मालिकेतून टीव्ही डेब्यू केला होता.

‘जमाई राजा’फेम अभिनेत्री शाइनी दोशी हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अमरनाथ यात्रेवर गेलेल्या शाइनीच्या वडिलांचा अचानक मृत्यू झाला आहे.प्राप्त माहितीनुसार, प्रवासादरम्यान अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने शाइनीच्या वडीलांचा मृत्यू झाला. शाइनीचे वडील अमरनाथ यात्रेला निघाले होते. याचदरम्यान त्यांना हृदयविकाराचा धक्का आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

प्रवासादरम्यान त्यांची तब्बेत अचानक बिघडू लागली. त्यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली. यानंतर त्यांना मेडिकल कॅम्पमध्ये हलविण्यात आले. पण काही क्षणात त्यांना हृदयविकाराचा धक्का आला. रूग्णालयात नेत असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शनिवारी त्यांचे पार्थिव गुजरातच्या घरी आणले जाणार आहे.

वडिलांच्या निधनाची बातमी मिळताच शायनी घरी रवाना झाला. तिच्या या दु:खाच्या काळात तिचे सांत्वन करण्यासाठी टीव्ही इंडस्ट्रीतील तिचा मित्रपरिवार गुजरातला पोहाचला आहे. 

शाइनी दोशीने 2013मध्ये संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सरस्वतीचंद्र’ या मालिकेतून टीव्ही डेब्यू केला होता. यात तिने कुसूम देसाईची भूमिका साकारली होती. त्यानंतर 2016 मध्ये ‘जमाई राजा’या मालिकेच्या तिसºया सीझनमध्ये तिने मुख्य भूमिका साकारली होती. यात ती रवी दुबेच्या अपोझिट दिसली होती. या मालिकेमुळे शाइनी नवी ओळख मिळाली. सध्या शाइनी ‘श्रीमद् भागवत’ या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय ती  सरोजिनी, बहू हमारी रजनीकांत, लाल इश्क आणि  दल ही तो है  या मालिकांमध्ये दिसली होती. तसेच 2017 मध्ये खतरों के खिलाडी या रिअ‍ॅलिटी शोमध्येही ती  सहभागी झाली होती.

टॅग्स :रवि दुबे