Join us

Jailer 2: रजनीकांत यांच्या गाजलेल्या 'जेलर'च्या सीक्वलची अधिकृत घोषणा लवकरच, चाहत्यांना उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 15:53 IST

रजनीकांत यांच्या सुपरहिट जेलर सिनेमाचा पुढचा भाग लवकरच रिलीज होणार आहे. याविषयी अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल

रजनीकांत यांचा गाजलेला 'जेलर' सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमात रजनीकांत यांच्या वेगळ्या तरीही संवेदनशील भूमिकेचं चांगलंच कौतुक झालं. २०२३ साली आलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. आता 'जेलर'च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी.  रजनीकांत यांच्या गाजलेल्या 'जेलर' सिनेमाचा सीक्वल लवकरच येणार असून त्याविषयीची अधिकृत घोषणा येत्या काहीच दिवसांमध्ये करण्यात येणार आहे.

जेलरचा सीक्वल लवकरच?

मीडिया रिपोर्टनुसार, 'जेलर' सिनेमाची टीम एक प्रोमो शूट करणार आहे. या प्रोमोमध्ये प्रेक्षकांना 'जेलर 2'ची अधिकृत तारीख कळणार आहे.  'जेलर 2'मध्ये रजनीकांत पुन्हा एकदा मुथुवेल पनडीयनच्या भूमिकेत दिसणार आहे.  'जेलर 2'मध्ये रजनीकांतसोबत आणखी कोणते कलाकार दिसणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. असंही सांगितलं जातंय रजनीकांत यांच्या वाढदिवशी  'जेलर 2'ची अधिकृत घोषणा करण्यात येईल.

 

 'जेलर 2'च्या बातमीने लोकांची उत्सुकता शिगेला

गेल्या वर्षभरापासून रजनीकांत यांचे चाहते आणि  'जेलर' सिनेमावर प्रेम करणारे प्रेक्षक  'जेलर 2'च्या अधिकृत घोषणेची वाट पाहत आहेत. अखेर आज ट्विटरवर  'जेलर 2' ट्रेंडिंगवर आल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.  'जेलर'मध्ये रजनीकांत यांच्यासोबत मीरना मेनन, वीनायकन, डॉ.शिवा राजकुमार या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती. आता  'जेलर 2'मध्ये रजनीकांतसोबत हेच कलाकार दिसणार की वेगळे याचा उलगडा लवकरच होईल.

टॅग्स :रजनीकांतTollywood