Join us

जयदीप अहलावतची मेहनत फळाली आली, मुंबईत घेतला कोट्यवधीचा आलिशान फ्लॅट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 17:10 IST

कसं आहे जयदीपचं मुंबईतील 'ड्रीम होम'?

आपल्या दमदार अभिनय कौशल्यासाठी ओळखला जाणारा अभिनेता जयदीप अहलावतचं (Jaideep Ahlawat) स्वप्न पूर्ण झालं आहे. त्याच्या आतापर्यंतच्या मेहनतीचं चीज झालं आहे. जयदीपने मुंबईत हक्काचं घर घेतलं आहे ज्याची किंमतच कोटींच्या घरात आहे. 'पाताल लोक'मधील हाथीराम चौधरी भूमिकेमुळे जयदीप अहलावतला कमालीची लोकप्रियता मिळाली. आज तो ओटीटीवरील सर्वात महागडा अभिनेता आहे. कसं आहे जयदीपचं मुंबईतील 'ड्रीम होम'?

जयदीप अहलावत आणि पत्नी ज्योती हुड्डा यांनी मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात हक्काचं घर घेतलं. स्क्वायर यार्ड्स रिपोर्टनुसार,  अंधेरी पश्चिम येथील या पूर्णा अपार्टमेंटमध्ये हा फ्लॅट आहे. या फ्लॅटची किंमत १० कोटी रुपये आहे. मे २०२५ मध्येच याची अधिकृत डील झाली.  अपार्टमेंटमध्ये १९५० स्क्वेअर फीटचा कार्पेट एरिया आहे. तर २१७.४७ स्क्वेअर मीटर बिल्ट अप एरिया आहे. यासोबतच पार्किंग स्पेस आहे. घराच्या डीलसाठी जयदीपने ६० लाख रुपये स्टॅम्प शुल्क आणि ३० हजार रुपये रजिस्ट्रेशन फीही भरली आहे. 

जयदीपने आपल्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक दमदार प्रोजेक्ट्स केले आहेत. 'रईस', 'राजी', 'पाताल लोक', 'महाराज', 'गँग्स ऑफ वासेपूर', 'थ्री ऑफ अस' आणि नुकत्याच आलेल्या 'द ज्वेल थीफ'मध्ये त्याने काम केलं आहे. आता तो आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र आहे. जयदीपचा एनएसडीतला मित्र आणि अभिनेता विजय वर्मानेही काही महिन्यांपूर्वीच मुंबईत सीफेसिंग फ्लॅट घेतला आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीमुंबईसुंदर गृहनियोजनबॉलिवूड