Join us
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाल्यानंतर या अभिनेत्रींनी स्वतःला केले क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 19:33 IST

अक्षयला कोरोनाची लागण झाल्यानंतर आता त्याच्या दोन नायिकांनी त्यांना क्वारंटाईन करून घेतले आहे. 

ठळक मुद्देअक्षयला कोरोनाची लागण होण्यापूर्वी तो रामसेतू या चित्रपटाचे चित्रीकरण करत होता.

अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाली असल्याचे त्याने नुकतेच सांगितले होते. त्याच्यावर सध्या उपचार सुरू असून तो उपचारांना चांगल्याप्रकारे प्रतिसाद देत आहे. अक्षयला कोरोनाची लागण झाल्यानंतर आता त्याच्या दोन नायिकांनी त्यांना क्वारंटाईन करून घेतले आहे. 

अक्षयला कोरोनाची लागण होण्यापूर्वी तो रामसेतू या चित्रपटाचे चित्रीकरण करत होता. त्यामुळे या चित्रपटातील नायिका जॅकलिन फर्नांडिस आणि नुशरत बरुचा यांनी स्वतःला क्वारंटाईन केले आहे. 

राम सेतूच्या सेटवर कोरोनाचा विस्फोट बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याच्या 'राम सेतू' चित्रपटातील सेटवरील तब्बल ४५ जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चित्रपटाच्या सेटवर इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचा विस्फोट झाल्यामुळे चित्रीकरण थांबविण्यात आले आहे.

बॉलिवूड कोरोनाच्या विळख्यात गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील बऱ्याच कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यात रणबीर कपूर, आर. माधवन, मनोज वाजपेयी, आमिर खान, आलिया भट, फातिमा सना शेख, गोविंदा, अक्षय कुमार, भूमी पेडणेकर, विकी कौशल, कतरिना कैफ या कलाकारांचा समावेश आहे.

टॅग्स :अक्षय कुमारजॅकलिन फर्नांडिसनुसरत भारूचा