Join us
Daily Top 2Weekly Top 5

जॅकलिनने या व्यक्तीला गिफ्ट केली महागडी कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2018 13:30 IST

जॅकलिन ही तिच्यासोबत काम करणा-यांना आपल्या परिवाराचा भाग मानते. याचं एक फार चांगलं उदाहरण बघायला मिळालं.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला हे चांगलंच माहिती आहे की, आपल्यासोबत काम करणा-यांना खूश कसं ठेवायचं. जॅकलिन ही तिच्यासोबत काम करणा-यांना आपल्या परिवाराचा भाग मानते. याचं एक फार चांगलं उदाहरण बघायला मिळालं.

जॅकलिनने तिचा मेकअप आर्टीस्ट शान याला एक महागडी कार गिफ्ट केली आहे. शान हा गेल्या काही वर्षांपासून जॅकलिनसोबत काम करतो आहे. नुकताच त्याचा बर्थडे झाला. यावेळी जॅकलिनने त्याला हे खास सरप्राईज गिफ्ट दिलं. शानने याचा एक व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केला आहे. 

हा व्हिडीओ शेअर करताना शान म्हणाला की, याप्रकारे माझ्या वाढदिवसाची सुरुवात झाली. जॅकलिनने खरंच सरप्राईज दिलं आहे. जेव्हा तू मला कारपर्यंत जाण्यासाठी मला व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सांगितले तेव्हा मला या सरप्राईजबद्दल काहीच कल्पना नव्हती, असे त्याने जॅकलिनबाबत लिहीले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, जॅकलिनने स्वत: ही कार निवडली नाही. ही कार घेण्यासाठी तिने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राची मदत घेतली. मिळालेल्या माहितीनुसार या गाडीची किंमत 20 लाख रुपये आहे. 

टॅग्स :बॉलिवूडजॅकलिन फर्नांडिस