Join us

 सलमान खानचा फोटो खिशात घेऊन फिरायचे जॅकी श्रॉफ, सांगितले कारण!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 08:00 IST

सलमान खानचा ‘भारत’ हा सिनेमा प्रदर्शित झालाय. या चित्रपटात जॅकी श्रॉफ यांनी सलमानच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. हेच जॅकी कधीकाळी सलमानचा फोटो खिशात घेऊन फिरायचे. होय, अलीकडे एका मुलाखतीत जॅकी श्रॉफ यांनी हा खुलासा केला. 

ठळक मुद्देआज प्रदर्शित झालेल्या ‘भारत’कडून सलमानला प्रचंड अपेक्षा आहेत.  या चित्रपटात सलमान वेगवेगळ्या पाच लूकमध्ये  आहे.

सलमान खानचा ‘भारत’ हा सिनेमा प्रदर्शित झालाय. या चित्रपटात जॅकी श्रॉफ यांनी सलमानच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. हेच जॅकी कधीकाळी सलमानचा फोटो खिशात घेऊन फिरायचे. होय, अलीकडे एका मुलाखतीत जॅकी श्रॉफ यांनी हा खुलासा केला. होय, १९८८ मध्ये ‘फलक’ या चित्रपटावेळी जॅकींनी सलमानचे काही फोटो काढले होते. पुढे अनेक वर्षे जॅकी सलमानचे हे फोटो खिशात घेऊन फिरायचे.

जॅकी यांनी सांगितले की, ‘ फलक या चित्रपटावेळी मी सलमानचे काही फोटो काढले होते. ते फोटो नेहमी माझ्या खिशात असत. मी ज्या कुण्या निर्मात्याकडे जायचो, त्यांना सलमानचे हे फोटो दाखवायचो आणि सलमानला त्यांच्या चित्रपटात कास्ट करण्याची विनंती करायचो. त्या काळात सलमानला चित्रपट मिळवून देण्यासाठी मी अनेक निर्मात्यांकडे गेलो होतो. कारण एकच होते, हा मुलगा एकदिवस स्टार होणार, असे मला वाटत होते. सलमान माझ्या मुलासारखा आहे आणि आज ‘भारत’मध्ये तो माझा मुलगा आहे. या चित्रपटात माझी भूमिका अगदीच छोटी आहे. पण ही भूमिका करून मी आनंदी आहे.’ एकेकाळी सलमान हाही माझा खूप मोठा चाहता होता. माझे बुट आणि जीन्स त्याला प्रचंड आवडायच्या, असेही जॅकी श्रॉफ यांनी सांगितले.

सलमान दरवर्षी ईदच्या मुहूर्तावर सिनेमा घेऊन येतो आणि त्याच्या चित्रपटावर चाहत्यांच्या अक्षरश: उड्या पडतात. गतवर्षी ईदच्या मुहूर्तावर सलमानचा ‘ट्युबलाईट’ हा सिनेमा रिलीज झाला होता. पण या चित्रपटाला म्हणावे तसे यश मिळाले नव्हते. पण आज प्रदर्शित झालेल्या ‘भारत’कडून सलमानला प्रचंड अपेक्षा आहेत.  या चित्रपटात सलमान वेगवेगळ्या पाच लूकमध्ये  आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित हा चित्रपट ‘ओड टू माय फादर’ या कोरियन चित्रपटाचा रिमेक आहे. सलमान खान आणि जॅकी श्रॉफसोबत कतरीना कैफ,नोरा फतेही, सुनील ग्रोव्हर, तब्बू, दिशा पाटनी असे अनेक कलाकार आहेत.  

टॅग्स :जॅकी श्रॉफसलमान खान