Join us
Daily Top 2Weekly Top 5

विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदानाचं 'पुढचं पाऊल'! लवकरच उरकणार साखरपुडा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 12:37 IST

अफेरअरच्या चर्चांदरम्यान विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना उरकणार साखरपुडा?

विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदाना हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीचे स्टार आहेत. ते कायमच करिअरबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून रश्मिका आणि विजय एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. त्यांचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण, त्या दोघांनाही अद्याप त्यांच्या रिलेशनशिपबाबत उघडपणे भाष्य केलेलं नाही. अशातच आता रश्मिका आणि विजय साखरपुडा करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा त्याच्या नात्यात आता पुढचं पाऊल टाकणार आहेत. 'न्यूज १८ तेलुगु'ने दिलेल्या वृत्तानुसार रश्मिका आणि विजयच्या घरी लगीनघाई सुरू आहे. रश्मिका आणि विजय लवकरच त्यांचा साखरपुडा उरकणार असल्याचं वृत्त आहे. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात रश्मिका आणि विजय engage होणार असल्याचं बोललं जात आहे. पण, यावर अद्याप दोघांकडूनही कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा रश्मिका आमि विजय चर्चेत आले आहेत. 

विजय आणि रश्मिकाने 'गीता गोविंदम' आणि 'डियर कॉम्रेड' या चित्रपटांत एकत्र काम केलं आहे. 'गीता गोविंदम' या सिनेमाच्या निमित्ताने त्यांनी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर केली होती. त्यांची ऑन स्क्रीन जोडी चाहत्यांच्याही पसंतीस उतरली होती. सण आणि कार्यक्रमाच्या दरम्यान रश्मिकाला विजयच्या घरीही अनेकदा स्पॉट करण्यात आलं होतं. आता त्या दोघांच्या साखरपुड्याच्या वृत्ताने चाहते आनंदी आहेत. 

टॅग्स :रश्मिका मंदानाविजय देवरकोंडासेलिब्रिटीTollywood