Join us

IPL सामन्यावेळी शिटी वाजवताना दिसली अभिनेत्री, सोशल मीडियात फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 17:22 IST

टॉस हरल्यानंतर पहिले फलंदाजी करत हैदराबाद टीमने 6 विकेट गमावून 20 ओव्हरमध्ये 132 रन्स केले. पण त्यांच्या गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन करत पंजाबच्या संपूर्ण टीमला 19.2 ओव्हरमध्ये 119 रन्सवर ऑल आऊट केले. 

हैदराबाद : आयपीएल 2018 च्या 25 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने किंग्स इलेव्हन पंजाबला 13 रन्सने मात दिली. टॉस हरल्यानंतर पहिले फलंदाजी करत हैदराबाद टीमने 6 विकेट गमावून 20 ओव्हरमध्ये 132 रन्स केले. पण त्यांच्या गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन करत पंजाबच्या संपूर्ण टीमला 19.2 ओव्हरमध्ये 119 रन्सवर ऑल आऊट केले. 

किंग्स इलेव्हन पंजाबच्या प्रत्येक सामन्यावेळी टीमचे सहमालक आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा सुध्दा उपस्थित होती. पण पंजाब आणि हैदराबादच्या सामन्यावेळी डिंपल गर्लवर तेलगू अभिनेत्रीची शिटी भारी पडली. राजीव गांधी स्टेडियममध्ये खेळण्यात आलेला हा सामना बघण्यासाठी हजारो प्रेक्षक आले होते. पण एवढ्या गर्दीत एक चेहरा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. हा सामना बघण्यासाठी टॉलिवूड अभिनेत्री ईशा चावला आली होती.

सनरायझर्स हैदराबादला सपोर्ट करण्यासाठी आलेली अभिनेत्री ईशा चावला सामन्यादरम्यान जोरदार शिट्या वाजवताना दिसली. तिचे हेच फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. ईशाच्या चेह-यावर हैदराबादच्या विजयाचा आनंद स्पष्ट दिसत आहे. 

कोण आहे ईशा चावला?

ईशा चावला ही प्रसिद्ध तेलगू अभिनेत्री आहे. तिने 2011 मध्ये आलेल्या 'प्रेमा कवाली' या सिनेमातून डेब्यू केलं होतं. त्यानंतर आत्तापर्यंत तिने 6 सिनेमात काम केलं आहे. यात एक कन्नड सिनेमाही होता. 

2012 मध्ये ईशा चावलाच्या एका किस सीनमुळे चांगलीच चर्चा झाली होती आणि सोशल मीडियातून तिच्यावर खूप टीका झाली होती. त्यानंतर ईशाने ट्विटर सोडून जाण्याची धमकी दिली होती. ईशाने दावा केला होता की, तिने हा सीन केलाच नाहीये.

टॅग्स :आयपीएल 2018बॉलिवूड