Join us

अभिमानास्पद! साजिद नाडियादवालाने उचलली १०० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 18:17 IST

Sajid nadiadwala: साजिद यांनी आपल्या कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांच्या नावाने १०० मुलींच्या शिक्षणासाठी मदत करणार असल्याचं जाहीर केलं आहे.

8 मार्च रोजी संपूर्ण जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. अनेकांनी प्रत्यक्ष तर काहींनी सोशल मीडियाचा आधार घेत स्त्रियांप्रतीचा आदर व्यक्त केला. यामध्येच प्रसिद्ध बॉलिवूड निर्माता, दिग्दर्शक साजिद नाडियादवाला  (Sajid nadiadwala) याने चक्क १०० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी उचचली आहे.

साजिद दरवर्षी त्याच्या ग्रँडसन एंटरटेन्मेंटच्या ऑफिसमध्ये महिला दिन साजरा करतो. यावर्षीही त्याने हा दिवस मोठ्या थाटात साजरा केला. विशेष म्हणजे यंदा त्याने १०० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. समाजातील महिलांनी सक्षम व्हावं यासाठी त्याने पुढाकार घेतला आहे.

साजिद यांनी आपल्या कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांच्या नावाने १०० मुलींच्या शिक्षणासाठी मदत करणार असल्याचं जाहीर केलं आहे. यासाठी त्यांनी नन्ही कली या प्रोजेक्टसोबत करारही केला आहे. या प्रोजेक्टच्या माध्यमातून देशातील १०० मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी मदत केली जाणार आहे. 

टॅग्स :साजिद नाडियाडवालाबॉलिवूडसेलिब्रिटी