इंदिरा गांधी (Indira Priyadarshini Gandhi) या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. त्यांचा जन्म 19 नोव्हेंबर, 1917 रोजी झाला होता. त्यांचे वडील जवाहरलाल नेहरू आणि आई कमला नेहरू होते.फिरोज गांधींशी लग्न केल्यानंतर इंदिरा गांधी यांना "गांधी" हे आडनाव मिळालं. पण आज आपण इंदिरा गांधींच्या खास मैत्रिणीबद्दल बोलूया. वैयक्तिक आयुष्य असो किंवा राजकारण असो प्रत्येक पावलावर एकमेंकीची साथ निभावली. इंदिरा गांधी यांच्या खास मैत्रिणीचा मुलगा आज बॉलिवूडवर राज्य करतोय.
बॉलिवूडचं आजचं लोकप्रिय कुटुंब आणि इंदिरा गांधी यांचे घनिष्ट संबंध होते. इंदिरा गांधी यांचे पुत्र राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्या लग्नातही बॉलिवूडच्या या कुटुबांचा मोठा वाटा होता. ते कुटुंब म्हणजे बच्चन कुटुंब. गांधी घराण्याचं बच्चन कुटुंबासोबत संबंध जुळले ते म्हणजे इंदिरा गांधी यांच्या मैत्रिणीमुळं. ती मैत्रिण म्हणजे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या आई आणि प्रसिद्ध हिंदी कवी हरिवंश राय बच्चन यांच्या पत्नी तेजी बच्चन (Teji Bachchan). तेजी बच्चन आणि इंदिरा गांधी यांच्यातील मैत्रीमुळे दोन्ही कुटुंबे खूप जवळ होती.अमिताभ आणि राजीव गांधी यांच्यातही चांगली मैत्री होती. राजीव गांधींच्या लग्नाच्या सर्व विधींमध्ये तेजी सहभागी झाल्या होत्या. खरं तर, जेव्हा राजीव गांधी आणि सोनिया यांचं लग्न होणार होतं. तेव्हा सोनिया यांना इंदिरा गांधी बच्चन कुटुंबाच्या घरीच थांबवलं होतं.
तेजी बच्चन यांना सामाजिक कार्यकर्त्या आणि मानसशास्त्राच्या प्राध्यापक म्हणूनही ओळखलं जातं. १२ ऑगस्ट १९१४ रोजी जन्मलेल्या तेजी बच्चन यांचे २००७ मध्ये वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झालं होतं. तेजी बच्चन यांचे खरे नाव तेजवंत कौर सूरी होतं. त्यांचा जन्म ब्रिटिश भारतातील पंजाबमध्ये झाला. तेजी बच्चन लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होत्या आणि त्यांना साहित्यात रस होता. त्यांनी मानसशास्त्राचा अभ्यास केला आणि नंतर लाहोरच्या खुब चांद डिग्री कॉलेजमध्ये मानसशास्त्र शिकवण्यास सुरुवात केली.
तेजी बच्चन लाहोरच्या डिग्री कॉलेजमध्ये शिकवत असताना, त्यांची भेट अलाहाबाद विद्यापीठात इंग्रजी शिकवणारे प्राध्यापक हरिवंश राय बच्चन यांच्याशी झाली. नंतर १९४१ मध्ये दोघांचेही लग्न अलाहाबादमध्ये झाले. दोघांनाही अमिताभ आणि अजिताभ ही दोन मुले होती. अमिताभ एक अभिनेते आहेत आणि अजिताभ बच्चन एक व्यावसायिक आहेत. बच्चन कुटुंबाचे कपूर कुटुंबासोबतही खास संबंध आहेत. तेजी बच्चन यांची नात श्वेता आणि राज कपूर यांचा नातू निखिल नंदा यांचे लग्न झालं आहे. निखिल नंदा यांची आई रितू या राज कपूर यांच्या कन्या आहेत. श्वेता आणि निखिल यांना नव्या आणि अगस्त्य ही दोन मुले झाली.