Join us
Daily Top 2Weekly Top 5

Indian Idol 12: 'माझ्यावर या गोष्टीचा आहे तणाव', शनमुख प्रिया सातत्याने होतेय ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 12:43 IST

सोशल मीडियावर युजर्स शनमुखप्रियाला शोमधून बाहेर काढण्याची मागणी करत आहेत.

इंडियन आयडॉलचा १२ वा सीझन सातत्याने चर्चेत येतो आहे. गेल्या काही दिवसांपासून या शोमधील काही स्पर्धक सातत्याने त्यांच्या गायनामुळे ट्रोलिंगला बळी पडत आहेत. तसेच या शोमधील परिक्षकांनाही ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. या स्पर्धकांपैकी शनमुखप्रियाला बऱ्याचदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो आहे. योडलिंग क्वीन नावाने प्रसिद्ध असलेली शनमुखप्रियाची गाणी लोकांना खूप आवडतात. मात्र कित्येक वेळा असे झाले की जेव्हा तिने गायलेल्या गाण्यांवर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती आणि तिला शोमधून बाहेर काढण्याची मागणी केली आहे.

आता सातत्याने ट्रोलिंगला बळी पडणाऱ्या शनमुखप्रियाने म्हटले की, या आठवड्यातील परफॉर्मन्ससाठी तिच्यावर जास्त तणाव आहे. या एपिसोडमध्ये ती ये मेरा दिल हे गाणे गाणार आहे. मात्र सध्या ती खूप ताण तणावाखाली आहे. ती सांगते की, जास्त चांगले परफॉर्मन्स झाला पाहिजे, या तणावाखाली मी आहे. मागील काही दिवसांपासून शनमुखप्रियावर चाहते नाराज आहेत.

शनमुखप्रिया मागील काही आठवड्यांपासून प्रेक्षकांच्या निशाण्यावर आहे. खरेतर सोशल मीडियावर युजर्स शनमुखप्रियावर आरोप करत आहेत की, जुन्या गाण्यांसोबत ती खूप छेडछाड करते. अशात नेहमी चाहते निर्मात्यांना त्यांना शोमधून बाहेर काढण्याची मागणी करत आहेत. काही दिवसांपूर्वी शनमुखप्रिया युजर्सच्या निशाण्यावर येत होती. खरेतर तिने सात खून माफमधील प्रियंका चोप्रावर चित्रीत झालेले डार्लिंग हे गाणे गायले होते. त्यानंतर तिला टीकेचा सामना करावा लागला होता.

युजर्सने तिच्यावर प्रियंकाच्या या गाण्याची वाट लावल्याचा आरोप केला होता. ट्विटरवर एका युजरने लिहिले की, इंडियन आयडलवालो कृपया शनमुखप्रियाला बाहेर काढा. ती प्रत्येक गाण्याची वाट लावते. तर दुसऱ्या युजरने शनमुखप्रियाच्या जागी इंडियन आयडॉलच्या परिक्षकांवरच सर्वाचे खापर फोडले. ते म्हणाले की, जेव्हा नेहा कक्कर सारखे परीक्षक आहेत, जे स्वतः गायनाऐवजी ओरडतात तर मग स्पर्धकांना काय दोष देणार. शोमधील सर्व परीक्षक असे आहे ज्यांचे गाणे लोकांना आवडत नाही. अशात स्पर्धकांकडून चांगल्या गाण्यांची अपेक्षा ठेवलीच नाही पाहिजे.

टॅग्स :इंडियन आयडॉलनेहा कक्कर