Join us

देव त्यांचं भलं करो, पण कुत्र्यांच्या शर्यतीत चित्त्याला...! आदित्य नारायणचं ट्रोलर्सला उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 19:40 IST

Indian Idol 12 : ‘इंडियन आयडल’चा 12 वा सीझन सध्या स्पर्धकांच्या परफॉर्मन्समुळे नाही तर वादामुळे चर्चेत आहे.

ठळक मुद्देसोशल मीडियावर अनेक युजर्स शन्मुखप्रियाला शोबाहेर हाकला अशी मागणी करत आहेत. यावरही आदित्य बोलला.

‘इंडियन आयडल’चा 12 वा सीझन (Indian Idol 12) सध्या स्पर्धकांच्या परफॉर्मन्समुळे नाही तर वादामुळे चर्चेत आहे. होय, शोच्या ‘किशोर कुमार स्पेशल एपिसोड’वरून सुरु झालेला हा वाद आता विकोपाला पोहोचण्याची चिन्हं आहेत. आता कारणही तसंच आहे. या स्पेशल एपिसोडमध्य किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांना स्पेशल गेस्ट म्हणून बोलण्यात आले होते. त्यांनी या शोवर टीका केली. यानंतर शोचा होस्ट आदित्य नारायणनेही (Aditya Narayan) या टीकेला उत्तर दिले. मग काय, नेटक-यांनी आदित्यला जबरदस्त ट्रोल केलं. आता आदित्यने या ट्रोल करणा-यांना उत्तर दिले आहे. (Aditya Narayan Trolled)

 ट्रोल करणा-यांना माझा साष्टांग प्रणाम..स्पॉटबॉयला दिलेल्या एका मुलाखतीत आदित्यने ट्रोल करणा-यांना प्रत्युत्तर दिले. जे लोक मला ट्रोल करत आहेत, त्यांना माझा साष्टांग प्रणाम आणि देव देव त्यांचं भलं करो. पण मी स्वत: ला एका चित्त्याप्रमाणे समजतो आणि त्यामुळे कुत्र्यांच्या शर्यतीत मी किती वेगवान आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार नाही. कधीकधी आपला मुद्दा सिद्ध करणे म्हणजे आपल्या स्वत:च्या बुद्धिमत्तेचा आणि अनुभवाचा अपमान आहे. रिअ‍ॅलिटी शोच्या स्पर्धकांच्या बाजूने बोलताना मला हे जाणवत आहे. इंडियन आयडल हा गेल्या 26 आठवड्यांपासून नंबर 1 चा शो आहे. त्याच्या बाजूने बोलण्याची मला काही गरज आहे का?, असे आदित्य यावेळी म्हणाला.

शन्मुखप्रियाची केली पाठराखण...सोशल मीडियावर अनेक युजर्स शन्मुखप्रियाला शोबाहेर हाकला अशी मागणी करत आहेत. यावरही आदित्य बोलला. शोचे स्पर्धक अगदी इतक्या कमी वयात आणि करिअरच्या सुरुवातीलाच टीकेला सामोरे जात आहेत रिअ‍ॅलिटी शोच्या बाहेरच्या जगाचे कडवे सत्य त्यांना कळतेय, याचा मला व्यक्तिश: आनंद आहे. त्यांचे चाहते वाढत आहेत, तेवढेच टीकाकारही वाढत आहेत, असे तो म्हणाला.

टॅग्स :आदित्य नारायणइंडियन आयडॉल