ठळक मुद्दे‘नयी दिशा नयी दशा...नयी रीति नयी नीति...नए भारत को, सच्चे भारत के सपूतों को शत शत नमन...’, असे लिहित कैलाश खेरने भारतीय जवानांना कडक सलाम ठोकला आहे.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई करत, पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेच्या तळावर १००० किलो वजनाचा बॉम्ब फेकला. पाकिस्तानच्या हद्दीत घुसून भारतीय वायूसेनेने केलेली ही आत्तापर्यंत सर्वांत मोठी कारवाई आहे. या कारवाईनंतर भारतीय वायूसेना, सैन्य आणि सरकारचे सर्वत्र कौतुक होत आहेत. बॉलिवूडही यात मागे नाही. अनुपम खेर, परेश रावल, मुग्धा गोडसे, अभिषेक बच्चन, अजय देवगण, अक्षय कुमार अशा अनेक बॉलिवूड स्टार्सनी भारतीय वायुसेनेना सलाम केला आहे.
{{#allowed}} {{#config.logo.enabled}}
{{/config.logo.enabled}}
{{/allowed}}
अजय देवगणने Mess with the best, die like the rest. Salute #IndianAirForce. @narendramodiअसे ट्विट करत, या भारतीय कारवाईचे तोंडभर कौतुक केले आहे. ‘शक्तिशाली व्यक्तिशी पंगा घ्याल तर चूर चूर व्हाल,’ असा त्याच्या या ट्विटचा अर्थ आहे.
अभिषेक बच्चनने ‘नमस्कार करते हैं’ असे ट्विट करत भारतीय वायूसेनेला सलाम केला आहे.
भारत माता की जय, असे ट्विट करत अभिनेते अनुपम खेर यांनी या कारवाईचे कौतुक केले आहे.
अभिनेते परेश रावल यांनी आपल्याट्विटमध्ये मोदी सरकार व वायूसेनेचे आभार मानले आहेत. आजची सकाळ खरोखरचं सुंदर राहिली, असे ट्विटत्यांनी केले आहे.
अक्षय कुमारने ‘अंदर घुस के मारो,’ असे लिहित भारतीय वायूसेनेच्या या कारवाईचा अभिमान वाटतो, असे लिहिले आहे.
गायक कैलाश खेर याचे ट्विट लक्षवेधी आहे. ‘नयी दिशा नयी दशा...नयी रीति नयी नीति...नए भारत को, सच्चे भारत के सपूतों को शत शत नमन...’, असे लिहित कैलाश खेरने भारतीय जवानांना कडक सलाम ठोकला आहे.