Join us
Daily Top 2Weekly Top 5

'धुरंधर २'मध्ये 'बडे साहब'च्या भूमिकेत कोण? सोशल मीडियावर मोठ्या अभिनेत्याचं नाव लीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 18:26 IST

काय! 'हा' अभिनेता 'धुरंधर २'मध्ये दिसणार?

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर: द रिव्हेंज' सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. 'धुरंधर'च्या ऐतिहासिक यशानंतर प्रेक्षक या सीक्वलची आतुरतेने वाट पाहत आहेत, ज्यात रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे 'बड़े साहब' हे पात्र, ज्याची ओळख अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. मात्र, आता सोशल मीडियावरील एका पेजमवरुन सिनेमात बडे साहब कोण असणार हे रिव्हील झालं आहे. यामुळे प्रेक्षक, चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आलंय. एक बडा अभिनेता या भूमिकेत झळकणार आहे. कोण आहे तो?

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

अलीकडेच 'लेटरबॉक्सड' या प्लॅटफॉर्मवर झालेल्या एका चुकीच्या अपडेटमुळे या पात्राचा उलगडा झाल्याचा दावा केला जात आहे. चित्रपटाच्या अधिकृत कास्टिंगबद्दल निर्मात्यांनी मौन पाळले असले तरी, 'लेटरबॉक्स्ड'वरील यादीत एका अनपेक्षित नावाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे, ते नाव म्हणजे इमरान हाश्मी. सोशल मीडिया युजर्सचा असा अंदाज आहे की, इमरान हाश्मीच या चित्रपटात 'बडे साहब'ची भूमिका साकारताना दिसू शकतात. यापूर्वी हे पात्र दाऊद इब्राहिम किंवा मसूद अजहर यांच्यावर आधारित असू शकते असे तर्क लावले जात होते, परंतु आता इमरानच्या नावाने चाहत्यांमध्ये नवी उत्सुकता निर्माण झाली आहे.

चित्रपटाच्या टीझरनुसार, कथानक हमजा (रणवीर सिंह) भोवती फिरते, जो रहमान डकैतच्या (अक्षय खन्ना) मृत्यूनंतर लियारीमध्ये बदला घेण्यासाठी जातो. त्याचा सामना मेजर इक्बाल (अर्जुन रामपाल) आणि त्याचा बॉस 'बडे साहब' यांच्याशी होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या सीक्वलमध्ये आर. माधवन, संजय दत्त आणि सारा अर्जुन यांसारखे जुने कलाकार तर दिसतीलच, पण त्यासोबतच राज जुत्शी आणि दिग्दर्शक आदित्य धर यांची पत्नी यामी गौतम ही देखील विशेष भूमिकेत असण्याची शक्यता आहे.

इमरान हाश्मीच्या संभाव्य कास्टिंगचा स्क्रीनशॉट रेडिटवर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी आनंदाने प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी इमरानच्या अभिनय कौशल्याचे कौतुक करत तो या भूमिकेसाठी योग्य असल्याचे म्हटले आहे. एका चाहत्याने लिहिले की, "इमरान हाश्मी 'बड़े साहब' म्हणून पडद्यावर पाहणे ही एक पर्वणीच असेल." आता निर्माते या अफवांवर कधी अधिकृत शिक्कामोर्तब करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : 'Dhurandhar 2': Is Emraan Hashmi the 'Bade Sahab'?

Web Summary : Emraan Hashmi may play 'Bade Sahab' in 'Dhurandhar 2' alongside Ranveer Singh. A casting update leak fuels speculation about his role in the sequel, directed by Aditya Dhar.
टॅग्स :धुरंधर सिनेमारणवीर सिंगबॉलिवूड