Join us
Daily Top 2Weekly Top 5

इलियाना डिक्रुज जॉन अब्राहमसोबत दिसणार 'ह्या' सिनेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 18:09 IST

अभिनेत्री इलियाना डिक्रुज अनीस बझ्मी यांच्यासोबत 'मुबारकां' सिनेमात काम केल्यानंतर त्यांचा आगामी चित्रपटात झळकणार आहे.

ठळक मुद्देइलियाना झळकणार जॉन अब्राहम सोबत

'रुस्तम', 'मुबारकां', 'बादशाहो' व 'रेड' यांसारख्या सिनेमात झळकलेली अभिनेत्री इलियाना डिक्रुज अनीस बझ्मी यांच्यासोबत 'मुबारकां' सिनेमात काम केल्यानंतर त्यांचा आगामी चित्रपट 'पागलपंती'मध्ये झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या दोघांव्यतिरिक्त या चित्रपटात अनिल कपूरदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

'पागलपंती' चित्रपटाची निर्मिती कुमार मंगत करत असून या सिनेमाचे चित्रीकरण पुढील वर्षी जानेवारीत लंडनमध्ये होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 'मुबारकां'मधील इलियानाच्या कामावर अनीस खुश होते आणि याच कारणामुळे त्यांनी तिला आपल्या प्रोजेक्टमध्ये घेण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान अनीस बझ्मी २००२ साली रिलीज झालेला चित्रपट 'आँखे'च्या सीक्वलवर काम करत होते. मात्र हा चित्रपट कायद्याच्या कचाट्यात सापडला. काही महिन्यांपूर्वी इलियाना कास्टिंग काउचवर बोलली होती. बॉम्बे टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार इलियानाने म्हटले की, ‘होय, ही गोष्ट ऐकायला थोडीशी विचित्र वाटते. परंतु मी याविषयी पूर्णपणे सहमत आहे की, जो कोणी कास्टिंग काउचबद्दल बोलते त्याचे करिअर संपून जाते. काही वर्षांपूर्वी साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये एका ज्युनियर आर्टिस्टने मला विचारले होते की, या सर्व गोष्टी कशापद्धतीने डिल केल्या जातात? तेव्हा मी तिला सांगितले होते की, हे मी तुला सांगू शकत नाही. याबाबतचा निर्णय सर्वस्वी तुझा आहे. कोणीही यासाठी तुझ्यावर दबाव आणू शकत नाही. बऱ्याचशा लोकांनी असे केले असून, ते सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून होते की, त्यांनी काय करायला हवे. लैंगिक शोषणाबद्दल सांगायचे झाल्यास मी याचे कधीच समर्थन करीत नाही,’ असेही इलियानाने सांगितले. 

टॅग्स :इलियाना डीक्रूजजॉन अब्राहमअनिल कपूर