Join us

अभिनेत्री इलियाना डीक्रूजनं दाखवली मुलाची झलक! शेअर केली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 13:51 IST

इलियाना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि आपल्या मुलाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रुझ हिने १ ऑगस्ट रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. सध्या ती सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. इलियाना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि आपल्या मुलाचे फोटो तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. यावेळीही तिने  इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना बाळाची झलक दाखवली.  तिच्या बाळाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

 इलियानाने मुलगा कोआसोबत पहिला थँक्सगिव्हिंग साजरा केला आहे. ज्याचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये स्वादिष्ट जेवणाचे ताट दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत गोंडस कोआ दिसत आहे. इलियाना डिक्रूझच्या मुलाचा क्युटनेस पाहून सगळेच त्याच्या प्रेमात पडले आहेत. 

 इलियानागेल्या काही काळापासून परदेशात राहत आहे. तिच्या बाळाचे नाव कोआ फिनिक्स डोलन असे आहे. लग्नापुर्वीच प्रेग्नेंट राहिल्यामुळे ती चर्चेत आली होती. इलियानाने १८ एप्रिल २०२३ रोजी ती प्रेग्नंट असल्याची घोषणा केली, त्यानंतर तिने बेबी बम्प फ्लाँट करतानाही फोटो शेअर केलेत. अभिनेत्रीचे अद्याप लग्न झालेले नाही. इलियाना डिक्रुझ. मूळची पोर्तुगलची आहे. 'बर्फी' सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याआधी ती साऊथमध्ये काम करत होती. 

टॅग्स :इलियाना डीक्रूजबॉलिवूडसेलिब्रिटी