Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोणी महिला लग्न झालेल्या पुरुषाच्या प्रेमात वेडी असते? रेखा यांचं उत्तर ऐकून सर्वजण चकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 12:49 IST

रेखा यांनी एका कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नावर दिलेलं उत्स्फुर्त उत्तर चांगलंच गाजलंय (rekha)

बॉलिवूडमधील दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रेखा. आजवर विविध सिनेमांमधून रेखा यांनी लोकांच्या मनावर राज्य केलंय. रेखा या अनेक कारणांमुळे चर्चेत राहिल्या. रेखा - अमिताभ बच्चन यांच्या नातेसंबंधांवरही अनेक चर्चा गाजतात. पण दोन्हीही कलाकारांनी कधीही याविषयी उघडपणे भाष्य केलं नाही. पण नुकतीच रेखाची क्लिप व्हायरल होतेय. या क्लिपमध्ये 'लग्न झालेल्या पुरुषाच्या प्रेमात असलेल्या कोणत्या स्त्रीला कधी पाहिलंय का?' असा प्रश्न विचारण्यात येतो. त्यावेळी रेखा यांनी दिलेल्या एका उत्तराने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

रेखा यांनी दिलेलं उत्स्फुर्त उत्तर अन्...

रेखा या कायम जाहीर इव्हेंटमध्ये हसतमुख चेहऱ्याने मीडियाशी आणि कलाकारांशी गप्पा मारताना दिसतात. रेखा यांचा हजरजबाबीपणा आणि सेन्स ऑफ ह्युमरही वाखाणण्यासारखा आहे. रेखा यांच्या हजरजबाबीपणाचा असाच एक अनुभव सर्वांना आलाय. रेखा एकदा 'इंडियन आयडॉल' मध्ये सहभागी होत्या. त्यावेळी होस्ट जय भानुशालीने रेखा आणि परीक्षक नेहा कक्करला विचारलं की, कधी एका लग्न झालेल्या माणसाच्या प्रेमात वेडी झालेल्या महिलेला पाहिलंय का? रेखा यांनी यावर अजिबात वेळ न दवडता उत्तर दिलं की, "मला विचारा ना!" यावर सर्वजण जोरजोरात हसायला लागतात. "मी काही बोललेच नाही", असा गमतीशीर आव पुढे रेखा आणतात.

रेखा या सिनेसृष्टीपासून दूर

रेखा या गेल्या अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीपासून दूर आहेत. पण रेखा प्रत्येक इव्हेंटमध्ये अन् पिक्चरच्या स्क्रिनिंगमध्ये हजर असतात. कायम इव्हेंटमध्ये रेखा त्यांच्या पारंपरिक साडी आणि लूकने प्रेक्षकांचं लक्ष वेधतात. अलीकडेच रेखा अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या लग्नाला खास पारंपरिक पेहरावात उपस्थित होत्या.  रेखा या शेवटी आपल्याला 'सुपर नानी' या सिनेमात पाहायला मिळाल्या.

टॅग्स :रेखाअमिताभ बच्चनबॉलिवूड