Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या विजयावर तैमूरचा जल्लोष, या अंदाजात टीम इंडियाला केलं सॅल्युट, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 12:30 IST

मँचेस्टरच्या ओल्ड ट्रैफर्ड मैदानात पार पडलेल्या आयसीसी विश्वचषक सामन्यात भारतानं पाकिस्तानचा ८९ रणांनी पराभव करीत ऐतिहासिक विक्रम केला. या विजयाचे सेलिब्रेशन संपूर्ण भारतात करण्यात आलं.

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तानमध्ये नुकताच सामना पार पडला. या सामन्यावर जगभरातील क्रिकेट प्रेमींसोबत बॉलिवूडमधील सेलेब्सचेही लक्ष होते. कित्येक बॉलिवूडचे सेलेब्स भारताच्या टीमला चिअर्स करण्यासाठी मँचेस्टरला गेले होते. तर काही सेलिब्रेटींनी सोशल मीडियावर भारताच्या टीमला पाठिंबा व चीअरअप केलं.

मँचेस्टरच्या ओल्ड ट्रैफर्ड मैदानात पार पडलेल्या आयसीसी विश्वचषक सामन्यात भारतानं पाकिस्तानचा ८९ रणांनी पराभव करीत ऐतिहासिक विक्रम केला. या विजयाचे सेलिब्रेशन संपूर्ण भारतात करण्यात आलं. या ऐतिहासिक विजयासाठी सेलिब्रेटींनी सोशल मीडियावर भारतीय क्रिकेट टीमचे अभिनंदन केले.

मात्र या सगळ्या शुभेच्छांमध्ये एक क्युट फोटो समोर आलाय. या फोटोंनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलंय. हा फोटो आहे छोटा नवाब तैमूरचा. मोठ्या सेलिब्रेटींच्यामध्ये तैमूरने क्युट अंदाजात भारताच्या विजयाचा जल्लोष केला.

तैमूरने भारतीय क्रिकेट टीमची जर्सी परिधान केली असून तो भारतीय क्रिकेट टीमला सॅल्यूट करतोय. तैमूरचा हा क्युट फोटो सगळीकडे व्हायरल होतोय.

करीना कपूर खान व करिश्मा कपूरने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करीत भारतीय क्रिकेट टीमचे अभिनंदन केलंय. या फोटोत करिना व करिश्मासोबत त्यांची आईदेखील पहायला मिळतेय. या फोटोला करीनाने कॅप्शन दिलंंय की, गो टीम इंडिया.

तर सैफ अली खान भारतीय क्रिकेट टीमला पाठिंबा देण्यासाठी मँचेस्टरला गेला होता. सोशल मीडियावर सैफचा व्हिडिओ खूप व्हायरला झाला. या व्हिडिओत सैफ व आलिया फर्नीचरवाला भारतीय टीमला चीअर्स करताना दिसले. आलिया फर्नीचरवाला सैफच्या आगामी सिनेमात त्याच्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. सैफ व आलिया दोघांची भारतीय क्रिकेट टीमच्या रंगासारखा निळा टीशर्ट परिधान केलं होतं. टीम इंडियाला चीअरअप करताना दिसले. 

टॅग्स :तैमुरभारतीय क्रिकेट संघआयसीसी आंतरखंडीय चषककरिना कपूरकरिश्मा कपूरसैफ अली खान