Join us
Daily Top 2Weekly Top 5

हृदयात समथिंग समथिंग’ सिनेमाचे रोमँटिक गाणे ‘तुझी ओढ लागली’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 15:01 IST

पिरॅमीड फिल्म्स हाऊस प्रस्तूत ‘हृदयात समथिंग समथिंग’ सिनेमाचे ‘तुझी ओढ लागली’ हे गाणे नुकतेच लाँच झाले आहे. सागर खेडेकर ह्यांचे गीत, अनिरूध्द काळे ह्यांचे संगीत असलेले ‘तुझी ओढ लागली’ हे गाणे आनंदी जोशी आणि जसराज जोशी यांनी गायले आहे. 

ठळक मुद्दे ‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपट 5 ऑक्टोबर 2018ला रिलीज होणार आहे

पिरॅमीड फिल्म्स हाऊस प्रस्तूत ‘हृदयात समथिंग समथिंग’ सिनेमाचे ‘तुझी ओढ लागली’ हे गाणे नुकतेच लाँच झाले आहे. सागर खेडेकर ह्यांचे गीत, अनिरूध्द काळे ह्यांचे संगीत असलेले ‘तुझी ओढ लागली’ हे गाणे आनंदी जोशी आणि जसराज जोशी यांनी गायले आहे. 

या रोमँटिक गाण्याविषयी संगीतकार अनिरूध्द काळे सांगतात, “विनोदी सिनेमातलं हे एकुलतं एक रोमँटिक गाणं आहे. सिनेमात स्नेहा चव्हाण ही प्रिया ह्या एका खट्याळ मुलीच्या भूमिकेत आहे. अशा खट्याळ मुलीचा रोमँस कसा असेल, हे त्या गाण्यातून प्रतीत होणं गरजेचं होतं. तो भाव आनंदीच खूप छान व्यक्त करू शकते, असा मला विश्वास होता. आणि आनंदीच्या आवाजाला जसराजचा आवाज कॉम्पिलमेन्ट करतो, असं वाटल्यामूळे ह्या दोघांचीच निवड गाण्यासाठी झाली. आणि ह्या दोघांमुळेच गाणं खूप सुमधूर झालं आहे.”

 आनंदी जोशी म्हणते, “जसराज सोबत गाणं गाण्याची एक आगळी मजा आहे. ह्या गाण्यात तो थोडा चढ्या आवाजात गातो. तर मी सॉफ्ट आवाजात गाते. एकाच गाण्यात रोमँसमध्ये असं वैविध्य देतानाही, आमची केमिस्ट्री जुळणं हे आमच्यापूढे आव्हान होतं. आणि अनिरूध्दच्यामूळे हे गाणं खूप छान झालंय.” अनिकेत विश्वासराव आणि स्नेहा चव्हाणवर चित्रीत झालेल्या ह्या रोमँटिक गाण्याला सध्या युट्यूबवर चांगला प्रतिसाद मिळत आहे.

 पिरॅमीड फिल्म्स हाऊस प्रस्तूत विनोदकुमार जैन, शैलेंद्र पारख, स्वप्नील चव्हाण, आणि अतुल गुगळे ह्यांची निर्मिती असलेला, सचिन संत ह्यांची सहनिर्मिती असलेला  प्रवीण राजा कारळे दिग्दर्शित, अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण, भुषण कडू, प्रियंका यादव आणि अशोक सराफ ह्यांच्या अभिनयाने सजलेला ‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपट 5 ऑक्टोबर 2018ला रिलीज होणार आहे. 

टॅग्स :अनिकेत विश्वासरावअशोक सराफ