Join us

War 2 Trailer : 'मैं इन्सान नही, जंग का हथियार हू'; हृतिकच्या 'वॉर २'चा जबरदस्त ट्रेलर, एकदा पाहून मन भरणार नाही

By देवेंद्र जाधव | Updated: July 25, 2025 11:42 IST

War 2 Trailer : 'वॉर २' सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. हृतिक रोशन आणि ज्यु. एनटीआर या दोघांचा खतरनाक अॅक्शन अवतार चर्चेत आहे

'वॉर २' सिनेमाच्या ट्रेलरची सर्वांना खूप उत्सुकता होती. हृतिक रोशन (hrithik roshan) आणि ज्यु. एनटीआर (jr ntr) यानिमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. अखेर नुकतंच डिजिटल प्लॅटफॉर्मवर 'वॉर २'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर इतका भारी आहे की, एकदा पाहून तुमचं मन भरणार नाही. हा ट्रेलर अनेक ट्विस्ट अँड टर्न्सनी भरलेला आहे. हृतिक आणि ज्यु, एनटीआर 'वॉर २'मध्ये जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहेत. जाणून घ्या ट्रेलरबद्दल

'वॉर २'चा ट्रेलर

'वॉर २'च्या ट्रेलरमध्ये दिसतं की, हृतिक आणि ज्यु, एनटीआर दोघेही सैनिक असतात. विशेष म्हणजे, दोघेही भारतीय सैनिक असतात. तरीही ते एकमेकांचा सूड घेण्यासाठी पुढे सरसावतात. पुढे असंही दिसतं की, हृतिक त्याच्याच बॉसला अर्थात आशुतोष राणाला डांबून ठेवतो. त्यामुळे आशुतोषच्या मनात राग असतो. तो हृतिकवर थुंकताना दिसतो. ट्रेलरच्या शेवटी हृतिक आणि ज्यु. एनटीआर दोघेही आमनेसामने येतात. दोघांमध्ये भयंकर मारामारी आणि अॅक्शन सीन्स दिसतात. २ मिनिटं ३५ सेकंदाच्या या ट्रेलरने अल्पावधीत इंटरनेटवर धुमाकुळ केला आहे.

या ट्रेलरची विशेष गोष्ट म्हणजे अभिनेत्री कियारा अडवाणी सुद्धा महिला सैनिकाची भूमिका साकारत आहे. यानिमित्त ज्यु. एनटीआर आणि हृतिक रोशन दोघेही त्यांच्या करिअरची पंचवीशी साजरी करत आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित वॉर २' हा YRF च्या स्पाय युनिव्हर्स मधील एक महत्त्वाचा सिनेमा आहे.  'वॉर २' हा सिनेमा १४ ऑगस्ट रोजी हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये जगभरातल्या चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात कियारा अडवाणी, आशुतोष राणा सुद्धा झळकत आहेत. याशिवाय शर्वरी वाघ, आलिया भट या सिनेमात कॅमिओ करण्याची शक्यता आहे.

टॅग्स :हृतिक रोशनज्युनिअर एनटीआरकियारा अडवाणीआशुतोष राणाबॉलिवूडवॉर