'देसी गर्ल' प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) गेल्या ६ वर्षांपासून भारतीय सिनेमापासून दूर आहे. इतक्या वर्षांनी आता ती कमबॅक करण्याच्या तयारित आहे. एस एस राजामौलींच्या SSMB29 सिनेमात प्रियंका दिसणार आहे. तिने सिनेमाचं शूटही सुरु केलं आहे. यासाठी प्रियंका काही दिवसांपूर्वीच भारतात आली होती. तर आता ती हृतिकच्या (Hrithik Roshan) 'क्रिश' (Krrish 4) फ्रँचायझीमध्ये प्रियंका चोप्रा कमबॅक करत असल्याची चर्चा आहे. यासाठी तिने कोट्यवधी रुपयांची मागणी केल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे.
प्रियंका चोप्रा २००६ साली आलेल्या 'क्रिश' सिनेमात दिसली होती. आता हृतिक स्वत: 'क्रिश ४'चं दिग्दर्शन करणार आहे. यामध्ये त्याचा ट्रिपल रोल असणार आहे. 'कोई मिल गया' नंतर प्रिती झिंटाही फ्रँचायझीमध्ये कमबॅक करत आहे. हृतिकने काही दिवसांपूर्वीच एक फोटो शेअर केला. यामध्ये तो गर्लफ्रेंड सबासह प्रियंका आणि निक जोनाससोबत दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि 'क्रिश ४'मध्ये प्रियंकाच्या कमबॅकची चर्चा सुरु झाली.
प्रियंका घेणार कोट्यवधींचं मानधन?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रियंकाने राजामौलींच्या सिनेमासाठी ३० कोटी घेणार आहे. तर 'क्रिश ४'साठीही तिने २० ते ३० कोटी मानधनाची मागणी केली आहे. शिवाय ती 'क्रिश ४'मध्ये प्रॉफिट शेअरही घेऊ शकते. अद्याप याबाबतीत कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.
प्रियंका चोप्रा एक ग्लोबल स्टार बनली आहे. त्यामुळे साहजिकच तिच्या मानधनातही तेवढी वाढ झाली आहे. प्रियंका २०१९ साली 'द स्काय इज पिंक' सिनेमात दिसली होती. हा तिचा शेवटचा सिनेमा होता. तिने हॉलिवूडमध्ये अनेक सिनेमे केले. आता तिच्या हिंदी सिनेमातील कमबॅकसाठी चाहते उत्सुक आहेत.