हृतिक रोशनचा (Hrithik Roshan) सुपरहिट 'क्रिश' फ्रँचायझीचा चौथा भाग येणार अशी घोषणा गेल्यावर्षीच झाली होती. तेव्हापासूनच चाहते 'क्रिश ४' (Krrish 4) च्या प्रतिक्षेत आहेत. राकेश रोशन यांनी काही दिवसांपूर्वी दिग्दर्शनातून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे क्रिश ४ येणार की नाही अशीच शंका निर्माण झाली होती. आता नुकतंच यासदंर्भात नवी माहिती समोर आली आहे. हृतिक सिनेमाचं शूट कधी सुरु करणार यावर अपडेट आलं आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, हृतिक रोशन 'क्रिश ४' चं शूट पुढील वर्षी सुरु करणार आहे. उन्हाळ्यात एप्रिल-मे मध्ये शूटला सुरुवात होण्याची शक्यता आहे. 'क्रिश ३' २०१३ मध्ये आला होता. आता याला ११ वर्ष उलटून गेली. 'क्रिश ४' ची निर्मिती हतिक रोशनचे वडील राकेश रोशन करणार आहेत तर करण मल्होत्रा दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे.
'क्रिश ४' आधी हृतिक रोशनचा 'वॉर २' येणार आहे. सध्या तो याच सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अयान मुखर्जी याचं दिग्दर्शन करत आहे. यामध्ये साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरचीही भूमिका आहे. सध्या सिनेमाच्या शेवटच्या शेड्युलचं काम सुरु आहे. मुंबई आणि युरोपमध्ये याचं शूट पार पडत आहे. किआरा अडवाणी आणि हृतिकची केमिस्ट्री यामध्ये पाहायला मिळणार आहे.