Join us

हृतिक रोशनचं टोपण नाव माहितीये का? 'द रोशन्स' डॉक्यु-सीरिजमध्ये झाला खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 13:48 IST

हृतिक रोशनचं  (Hrithik Roshan) टोमण नाव तुम्हाला माहितीये का? तर जाणून घ्या…

Hrithik Roshan Nickname Revealed: बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना आपण त्यांच्या नावाने ओळखतो. काही कलाकारांना चाहतेही एखादं आवडतं नाव देतात. जसे अभिनेता शाहरुख खानला 'किंग' म्हटलं जात, तर अभिनेता सलमान खानला 'भाईजान'. पण सर्वसामान्यांप्रमाणे त्यांना देखील टोपण नावे असतात. त्यांच्या घरी लाडाने त्यांना एखादं नाव दिलेलं असतं.  बॉलिवूडचा सुपरहीरो म्हणून ओळखला जाणारा हृतिक रोशनचं  (Hrithik Roshan) टोमण नाव तुम्हाला माहितीये का? तर जाणून घ्या…

 ऋतिक रोशनने आपल्या फिल्मी करिअरमध्ये भरपूर सिनेमांत अभिनय केला आहे. 2000 साली ''कहो ना प्यार है'  सिनेमाद्वारे ऋतिक पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर हीरोच्या रुपात झळकला होता. त्यानंतर 'कोई मिल गया' हा ऋतिकचा  सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरडुपर हिट ठरला होता.यानंतर 'क्रिश', 'धूम 3', 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' यांसारखे सुपरहिट सिनेमे त्याने दिले आहेत. ऋतिक रोशनला भारताचा 'ग्रीक गॉड' म्हटले जाते. पण, त्याच्या घरी त्याचं एक हटके नावं आहे. 

ऋतिकचे वडील राकेश रोशन यांचं टोपण नाव 'गुड्डू' असं आहे.  तर मग त्यानुसार ऋतिकच्या आजीनं त्याच नाव 'डुग्गु' असं ठेवलं. ऋतिकला त्याच्या घरी आणि मित्र मैत्रिणींही 'डुग्गु' नावानेच हाक मारतात. याचा खुलासा 'द रोशन्स' डॉक्यु-सीरिजमध्ये झाला आहे. नुकतंच 'द रोशन्स' ही डॉक्यु-सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. यामध्ये  रोशन कुटुंबाच्या तीन पिढ्यांनी बॉलिवूडवर कसे राज्य केले, हे दाखवण्यात आलं आहे. 

हृतिक फक्त त्याच्या सिनेमांमुळे चर्चेत नसतो, तर अभिनेता त्याची पर्सनॅलिटी आणि डान्समुळे देखील कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असतो. लवकरच हृतिक रोशनचा सुपरहिट 'क्रिश' फ्रँचायझीचा चौथा भाग येणार आहे. चाहते 'क्रिश ४' (Krrish 4) च्या प्रतिक्षेत आहेत. तर 'क्रिश ४' आधी हृतिक रोशनचा 'वॉर २' येणार आहे. सध्या तो याच सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अयान मुखर्जी याचं दिग्दर्शन करत आहे. यामध्ये साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरचीही भूमिका आहे. सध्या सिनेमाच्या शेवटच्या शेड्युलचं काम सुरु आहे. मुंबई आणि युरोपमध्ये याचं शूट पार पडत आहे. किआरा अडवाणी आणि हृतिकची केमिस्ट्री यामध्ये पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :हृतिक रोशनसेलिब्रिटीबॉलिवूडराकेश रोशन