Join us
Daily Top 2Weekly Top 5

एका सिनेमासाठी किती मानधन घेतात या बॉलिवूड अभिनेत्री?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 13:23 IST

बॉलिवूडच्या अभिनेत्रींना एका सिनेमासाठी किती मानधन मिळतं हे तुम्हाला माहीत आहे का? नाही ना? चला जाणून घेऊया बॉलिवूडच्या अभिनेत्रींना एका सिनेमासाठी किती पैसे मिळतात. 

मुंबई : 2018 या वर्षाच्या सुरुवातीलाच बॉलिवूड अभिनेत्रींनी चांगलाच धमाका केलाय. कारण अभिनेत्रींची भूमिका असलेल्या काही सिनेमांनी चांगलीच कमाई केली. अनेकदा आपण सिनेमांच्या कमाईचे मोठे मोठे आकडे वाचत असतो. पण बॉलिवूडच्या अभिनेत्रींना एका सिनेमासाठी किती मानधन मिळतं हे तुम्हाला माहीत आहे का? नाही ना? चला जाणून घेऊया बॉलिवूडच्या अभिनेत्रींना एका सिनेमासाठी किती पैसे मिळतात. 

दीपिका पदुकोण

बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त मानधन घेणारी सध्याची अभिनेत्री दीपिका आहे. एका सिनेमासाठी दीपिका ही 12 कोटी रुपये मानधन घेते. याचवर्षी दीपिकाच्या पद्मावत या सिनेमाने 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली.  

प्रियंका चोप्रा

केवळ बॉलिवूडच नाहीतर हॉलिवूडमध्येही प्रियंका चोप्रा आपली जादू चालवत आहे. प्रियंका ही एका सिनेमासाठी 10 ते 12 कोटी रुपये मानधन घेते.  

कतरिना कैफ

नुकतीच सलमान खानसोबत टायगर जिंदा है या सिनेमात दिसलेल्या कतरिनाच्या गेल्या काही सिनेमांची फार काही कमाल केली नाही. पण कतरिना एका सिनेमासाठी 7 कोटी रुपये मानधन घेते.

कंगना राणावत

आपल्या अदाकारीच्या जोरावर आणि कोणताही मोठा अभिनेता समोर नसतानाही बॉक्स ऑफिसवर एकापेक्षा सुपरहिट सिनेमे देणारी कंगना एका सिनेमासाठी 10 कोटी रुपये घेते. कंगनाचा आगामी सिनेमा 'मणिकर्णिका'साठी तिने 10 कोटी मानधन घेतलं. 

आलिया भट्ट 

राझी या सिनेमाच्या यशानंतर आलियाने आपलं मानधन वाढवलं आहे. आलिया आधी एका सिनेमासाठी 5 कोटी रुपये मानधन घेत होती. आता आलियाने मानधन वाढवून 9 कोटी रुपये केले आहे. 

अनुष्का शर्मा

बॉलिवूडमधील सर्व सुपरस्टारसोबत काम केलेली आणि आपली वेगळी छाप सोडणारी अनुष्का शर्मा एका सिनेमासाठी 6 कोटी रुपये मानधन घेते.

विद्या बालन

आपल्या बहारदार अदाकारीसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री विद्याही आपल्या अदाकारीने सिनेमा हिट करण्याची क्षमता ठेवते. सध्या तिचा कोणताही मोठा सिनेमा येत नसला तरी विद्या एका सिनेमासाठी 5 कोटी रुपये मानधन घेते.  

टॅग्स :बॉलिवूड