Join us

मुंबईत मोठ्या जागेत उभं राहिलंय Nawazuddin Siddiquiचं घर; फोटो पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 16:13 IST

Dream House of Nawazuddin Siddiqui :  नवाजुद्दीन सिद्दीकीने मुंबईत आपले ड्रीम होम बनवले आहे.

आपल्या अभिनयाने बॉलिवूड नवाजुद्दीन सिद्दीकी(Nawazuddin Siddiqui )ने वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तो आपल्या प्रत्येक भूमिकेवर छाप सोडतो. पण सध्या नवाज एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.  नवाजुद्दीन सिद्दीकीने मुंबईत आपले ड्रीम होम बनवले आहे.विशेष म्हणजे या घराचे इंटिरिअर डिझाइनही अभिनेत्यानेच केले आहे. अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, नवाजुद्दीन सिद्दीकी स्वतः या घराचा इंटिरियर डिझायनर बनला आहे. 

3 वर्षात घर बनवलेनवाजुद्दीन सिद्दीकी दीर्घकाळापासून चित्रपटांमध्ये सक्रिय आहे. जवळपास दशकभराच्या मेहनतीनंतर त्यांनी त्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. अभिनेत्याचा बंगला तयार होण्यासाठी तीन वर्षे लागली. विशेष बाब म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकीने मुंबईत हा बंगला त्याच्या मूळ गाव बुढाणा येथील जुन्या घरासारखाच बनवला आहे. याला घरातला त्याने पांढरा रंंग दिला आहे. 

वडिलांच्या स्मरणार्थ ठेवले बंगल्याचे नावनवाजुद्दीन सिद्दीकीने आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ या आलिशान घराचे नाव ठेवले आहे. अभिनेत्याने आपल्या घराचे नाव 'नवाब' ठेवले आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींची घरे फक्त त्यांच्या नावाने ओळखली जातात, ज्यात शाहरुख खानचे घर 'मन्नत' देखील आहे.  आता या यादीत नवाजुद्दीन सिद्दीकीचे घर 'नवाब' देखील सामील झाले आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या अभिनेता त्याच्या आगामी 'टिकू वेड्स शेरू' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. कंगना राणौत या चित्रपटाची निर्मिती करत आहे. याशिवाय टायगर श्रॉफच्या 'हिरोपंती 2'मध्येही नवाज नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. 

टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकीबॉलिवूड