Join us
Daily Top 2Weekly Top 5

'पिंट्या'च्या घरी पाळणा हलणार! 'होणार सून मी या घरची' फेम अभिनेता बाबा होणार, थाटात केलं पत्नीचं डोहाळेजेवण

By कोमल खांबे | Updated: February 26, 2026 08:40 IST

'होणार सून मी ह्या घरची' मालिकेत जान्हवीच्या भावाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता रोहन गुजर लवकरच बाबा होणार आहे. लग्नाच्या ८ वर्षांनी रोहनच्या घरी पाळणा हलणार आहे.

'होणार सून मी ह्या घरची' मालिकेत जान्हवीच्या भावाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता रोहन गुजर लवकरच बाबा होणार आहे. लग्नाच्या ८ वर्षांनी रोहनच्या घरी पाळणा हलणार आहे. रोहनची पत्नी स्नेहल ही गरोदर असून नुकताच तिच्या डोहाळेजेवणाचा कार्यक्रम पार पडला. रोहनने बेबी शॉवरचे काही खास क्षण शेअर करत बाबा होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 

रोहनने त्याच्या सोशल मीडियावरुन डोहाळेजेवणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने म्हटलं आहे की "मग गोष्टीत पुढे काय झालं माहितेय का? आमचा हा दिवस आणखी स्पेशल करण्यासाठी धन्यवाद. प्रेमाच्या माणसांसोबत रंगलेला हा प्रेमळ सोहळा". या व्हिडीओमध्ये रोहन आणि स्नेहल आनंदी दिसत आहेत. तर घरात नवा पाहुणा येणार असल्याने कुटुंबीयही आनंदात आहे. मोठ्या धुमधडाक्यात हे डोहाळेजेवण पार पडलं. 

रोहनने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'होणार सून मी ह्या घरची' मालिकेत जान्हवीचा भाऊ पिंट्याच्या भूमिकेने त्याला लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर 'लव्ह लग्न लोचा', 'साथ दे तू मला', 'सांग तू आहेस का', 'बन मस्का', 'नवी जन्मेन मी', 'बारायण' या मालिकांमध्ये तो दिसला. काही वेब सीरिजमध्येही त्याने काम केलं आहे. 'मोरया', 'खून करायचाय', 'अलिबाग बायपास' या काही सिनेमांमध्येही तो झळकला. 

English
हिंदी सारांश
Web Title : 'Honaar Soon' fame Rohan Gujar and wife expecting first child!

Web Summary : Actor Rohan Gujar, known for 'Honaar Soon Me Hya Gharchi,' is expecting his first child after 8 years of marriage. His wife, Snehal, recently had her baby shower. Rohan shared the good news with a video on social media.
टॅग्स :रोहन गुजरटिव्ही कलाकार