Join us

विल स्मिथचा ‘जिनी’ अवतार अन् नेटकरी ‘सैराट’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 15:48 IST

हॉलिवूडचा लोकप्रीय अभिनेता विल स्मिथचा ‘अलादीन’ हा आगामी चित्रपट सध्या बराच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा फर्स्ट लूक व १ मिनिटांचा ट्रेलर आऊट झाला.

हॉलिवूडचा लोकप्रीय अभिनेता विल स्मिथचा ‘अलादीन’ हा आगामी चित्रपट सध्या बराच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा फर्स्ट लूक व १ मिनिटांचा ट्रेलर आऊट झाला. या लूकमध्ये विल स्मिथचे शरीर निळ्या रंगाचे दिसतेय. विल स्मिथचे लूक आऊट झाले आणि लगेच व्हायरल झाले. केवळ इतकेच नाही तर यावरून विल स्मिथ ट्रोलही झाला. 

त्याचा हा नवा अवतार पाहून काही सुपीक डोक्याच्या युजर्सनी त्याची जाम मजा घेतली.  ‘विल स्मिथ जिन्न, मेरे बुरो सपनों का शिकार करेगा’, असे एका युजरने लिहिले. तर एका युजरने ‘विल स्मिथचे हे लूक पाहिल्यानंतर मी आता कधीच झोपू शकणार नाही,’ असे म्हणत त्याची खिल्ली उडवली.डिज्नीच्या या चित्रपटात विल स्मिथसोबत मेना मसौद आणि ब्रिटीश अभिनेत्री नाओमी स्कॉट मुख्य भूमिकेत आहेत. दिग्दर्शक गाए रिची हा चित्रपट दिग्दर्शित करतोय. येत्या २४ मे रोजी हा चित्रपट रिलीज होतोय. १९९२ मध्ये डिज्नीने अलादीन चित्रपट बनवला होता. २७ वर्षांनंतर डिज्नी याच चित्रपटात रिमेक घेऊन येतेय.

 

टॅग्स :हॉलिवूड