Join us

धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्याने घेतला जगाचा निरोप; कारमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 10:28 IST

प्रसिद्ध अभिनेत्याने वयाच्या ५५ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप; कारमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ, मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट

South Korean Actor Song Young-Kyu Passes Away : मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दक्षिण कोरियातील प्रसिद्ध अभिनेते सॉन्ग यंग क्यू यांनी वयाच्या ५५ व्या जगाचा निरोप घेतला आहे. रविवारी ३ ऑगस्ट रोजी अभिनेत्याचा मृतदेह त्यांच्या कारमध्ये आढळल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. अभिनेत्याच्या निधनाने इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. दरम्यान, अभिनेत्याच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.

पीटीआयच्या वृत्तानुसार, रविवारी ग्योंगीमधील योंगिन येथील एका टाउनहाऊस कॉम्प्लेक्समध्ये अभिनेत्याची कार आढळली. शिवाय, काही दिवसांपूर्वीच अभिनेता दारू पिऊन गाडी चालवण्याच्या प्रकरणात अडकला होता. त्यांना अटक करण्यात आली होती. या घडल्या प्रकारामुळे अभिनेत्याला अनेक शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्याच्यानंतर काही दिवसांतच त्यांचा मृतदेह कारमध्ये गंभीर अवस्थेत आढळला. अभिनेत्याच्या निधनाने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

सॉन्ग यंग क्यू यांच्याबद्दल जाणून घेऊया...

सॉन्ग यंग क्यू हे दक्षिण कोरियातील प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांनी साल १९९४ मध्ये बालसंगीत नाटक 'विझार्ड म्युरल' द्वारे आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर या क्षेत्रात नाव कमावलं. 'बिग बेट', 'ह्वारंग' आणि 'हॉट स्टोव्ह लीग' यासह अनेक नाटकांमध्ये त्यांनी अभिनय करुन त्यांनी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. सॉंग यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली आहेत. 

टॅग्स :दक्षिण कोरियासेलिब्रिटीमृत्यू