Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध अभिनेत्याचं ३९व्या वर्षी निधन, घरातच आढळला मृतदेह, मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 10:41 IST

मंगळवारी(१२ नोव्हेंबर) घरातच अभिनेत्याचा मृतहेद आढळला. त्याच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

सिनेविश्वातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. साऊथ कोरियातील प्रसिद्ध अभिनेत सोंग जे रिम याचं ३९व्या वर्षी निधन झालं आहे. मंगळवारी(१२ नोव्हेंबर) घरातच त्याचा मृतहेद आढळला. त्याच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. सोंग जे रिमच्या निधनाने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 

सोंग जे रिमच्या मृत्यूप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. त्याच्या घरात सुसाइट नोटही मिळाली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे सोंग जे रिमने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. पण, अद्याप पोलिसांनी याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, १४ नोव्हेंबरला त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

२००९ मध्ये सोंग जे रिमने त्याच्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली होती. मून एम्ब्रेसिंग द सन या ऐतिहासिक सिनेमात त्याला पहिल्यांदा मुख्य भूमिका साकारायची संधी मिळाली होती. २०११ साली हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमातील भूमिकेमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली होती. 

टॅग्स :सेलिब्रिटीमृत्यूदक्षिण कोरिया