Join us

बॅटमॅनही कोरोना व्हायरसच्या जाळ्यात, सुरू झालेलं शूटींग पुन्हा बंद...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 12:58 IST

अभिनेता रॉबर्टचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. नुकतीच पॅटिनसनने 'द बॅटमॅन' ची शूटींग सुरू केली होती. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर शूटींग थांबवण्यात आलंय.

हॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता रॉबर्ट पॅटिनसनला कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेता रॉबर्टचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. नुकतीच पॅटिनसनने 'द बॅटमॅन' ची शूटींग सुरू केली होती. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर शूटींग थांबवण्यात आलंय.

याबाबत माहिती देताना वार्नर ब्रदर्सचे प्रवक्ता म्हणाले की, 'द बॅटमॅन प्रॉडक्शनचा एक सदस्य कोरोना संक्रमित आढळला आहे. प्रोटेकॉलनुसार, आता तो आयसोलेशनमध्ये आहे. तसेच सध्या सिनेमाचं शूटींगही थांबवण्यात आलं आहे'.

मॅट रीव्स याच्या 'द बॅटमॅन' सिनेमाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. लॉकडाऊनमुळे सिनेमाचं शूटींग थांबवण्यात आलं होतं. एक सप्टेंबरपासून पुन्हा शूटींग सुरू करण्यात आलं होतं. पण आता रॉबर्ट पॅटिनसन पॉझिटिव्ह आल्याने शूटींग पुन्हा रद्द करण्यात आलं आहे.

सिनेमाचा दिग्दर्शक मॅट रीव्स म्हणाले होते की, या सिनेमाची तीन महिन्यांचं शूटींग शिल्लक आहे. जे लवकरच पूर्ण केलं जाईल. मेकर्सना सिनेमाचं शूटींग या वर्षाच्या शेवटपर्यंत पूर्ण करायचं आहे. जेणेकरून २०२१ मध्ये सिनेमा रिलीज करता यावा. या सिनेमातील रॉबर्ट पॅटिनसनचा लूक फेब्रुवारीमध्ये रिलीज करण्यात आला होता.

रॉबर्ट पॅटिनसनआधी क्रिस्चन बेल बेन अफ्लेक आणि जॉर्ज क्लूनी यांनी बॅटमॅनची भूमिका साकारली आहे. आता ही भूमिका रॉबर्ट साकारणार आहे. बॅटमॅनमध्ये जोई क्रॅविट्स कॅटवूमेनच्या भूमिकेत, पॉल डॅनो रिडलरच्या भूमिकेत, ऐंडी सरकिस अल्फ्रेड पेनीवर्थच्या भूमिकेत, कॉलिन फरेल पेंग्विनच्या भूमिकेत आणि जेफरी राइट जिम गॉरडनच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा २५ जून २०२१ ला रिलीज होणार आहे. 

टॅग्स :हॉलिवूडकोरोना वायरस बातम्या