Join us
Daily Top 2Weekly Top 5

OMG! रॅपरनं अब्जावधी खर्चून कपाळावर कोरला ‘तिसरा डोळा’, आता वेदनेनं झाला बेहाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 11:47 IST

हौसेला मोल नसतं म्हणतात ते खरंय…

ठळक मुद्देहोय, 1 अब्ज 74 कोटींचा हा हिरा लिलने कपाळावर मढवला खरा. पण आता त्याला यामुळे असह्य वेदना सहन कराव्या लागत आहेत.

हौसेला मोल नाही, असे म्हणतात ते उगाच नाही. हौसेखातर लोक काहीही करायला तयार होतात. अर्थात अनेकदा त्याचे दृष्परिणामही भोगावे लागात. Lil Uzi Vert हा रॅपर त्यापैकीच एक. इतरांपेक्षा हटके करण्याच्या नादात या रॅपरने काय करावे तर चक्क आपल्या कपाळावर गुलाबी रंगाचा महागडा हिरा कपाळावर बसवला.

होय, अक्षरश: कपाळावर मढवला. तो सुद्धा साधासुधा हिरा नाही तर 11 कॅरेटचा. त्याची किंमत किती तर 24 मिलियन डॉलर म्हणजे 1 अब्ज 74 कोटी. होय, या हि-यासाठी 26 वर्षाचा लिल 2017 पासून पैसे गोळा करत होता. अगदी पै-पै जोडून त्याने हा हिरा खरेदी केला. आता केला तर केला, पण हा हिरा अख्ख्या जगासमोर मिरवावा, या विचाराने तो इरेला पेटला. मग त्याने काय केले तर हा हिरा चक्क कपाळावर तिस-या डोळ्यासारखा कोरण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय त्याला चांगलाच महागात पडला.

होय, 1 अब्ज 74 कोटींचा हा हिरा लिलने कपाळावर मढवला खरा. पण आता त्याला यामुळे असह्य वेदना सहन कराव्या लागत आहेत. कपाळावर सूज आली आहे. हळूहळू त्याच्या कपाळाची सूज वाढत चाललीये. वेदना इतक्या की त्या सहन करणे त्यामुळे तो बेहाल झाला आहे.

30जानेवारीला लिलने या हि-याबद्दल ट्वीटही केले होते. तेव्हापासून त्याचे चाहते त्याच्या या हि-याबद्दल अधिक माहिती देण्याची विनंती त्याला करत होते. आता हा हिरा किती दिवस वुड्सच्या कपाळावर राहतो, ते बघूच.

टॅग्स :हॉलिवूड