Join us

पाहा, प्रियांका चोप्राच्या ‘इजन्ट इट रोमॅन्टिक’ या हॉलिवूडपटाचा ट्रेलर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 13:20 IST

अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या लग्नांच्या बातम्यांनी चर्चेत आहेत. लवकरचं प्रियांका लग्नबंधनात अडकणार आहे. यातचं एक धमाकेदार बातमी आली आहे. होय, प्रियांकाचा आगामी हॉलिवूड चित्रपट ‘इजन्ट इट रोमॅन्टिक’चा ट्रेलर रिलीज झालाय.

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाचा जलवा दाखवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या लग्नांच्या बातम्यांनी चर्चेत आहेत. लवकरचं प्रियांका लग्नबंधनात अडकणार आहे. यातचं एक धमाकेदार बातमी आली आहे. होय, प्रियांकाचा आगामी हॉलिवूड चित्रपट ‘इजन्ट इट रोमॅन्टिक’चा ट्रेलर रिलीज झालाय. या चित्रपटात प्रियांका चोप्रा एका योग अ‍ॅम्बिसीडरच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात रिबेल विल्सन, लायन हेम्सवर्थ आणि एडम डिवाईनही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. प्रियांका चोप्राचा ‘क्वांटिको’ हीअमेरिकन सीरिज प्रचंड गाजली होती. या शोने प्रियांकाला हॉलिवूडमध्ये स्वत:चीी एक वेगळी ओळख दिली. ‘क्वांटिको’ या सीरिजमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री प्रियांका सध्याच्या घडीला एक ग्लोबल आयकॉन झाली आहे. आंतरराष्ट्रीय मनोरंजनविश्वातील प्रियांकाचा वावर आणि तिची लोकप्रियता पाहता तिच्या चाहत्यांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसून येत आहे. परदेशात जास्तीत जास्त वेळ व्यतित करणारी देसी गर्ल लवकरच ‘स्काय इज पिंक’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये वापसी करतेय. या चित्रपटात ती फरहान अख्तरसोबत दिसणार आहे. याचदरम्यान प्रियांका अमेरिकन सिंगर निक जोनास याच्यासोबत लग्न करणार आहे. भारतीय आणि अमेरिकन पद्धतीने होणाऱ्या या लग्नाची तारीख अद्याप गुलदस्त्यात आहे. ही तारीख जाहिर होताच आम्ही तुम्हाला कळवू. त्यापूर्वी पीसीच्या ‘इजन्ट इट रोमॅन्टिक’ या हॉलिवूडपटाचा ट्रेलर आपण पाहायलाचं हवा...

टॅग्स :प्रियंका चोप्राहॉलिवूड