Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाहा, रॉयल बेबीची पहिली झलक, प्रिन्स हॅरी-मेगनने दिले हे नाव!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 12:30 IST

प्रिन्स हॅरी आणि हॉलिवूड अभिनेत्री मेगन मार्कल यांच्या घरी गत ६ मे रोजी पुत्ररत्न जन्मास आले. या रॉयल बेबीची एक झलक पाहण्यास प्रत्येकजण उत्सुक होता. त्यामुळे शाही कुटुंबाने रॉयल बेबीचे अधिकृत फोटो शेअर केलेत.

ठळक मुद्देगतवर्षी १९ मे रोजी प्रिन्स हॅरी व मेगन यांचा शाही विवाह पार पडला होता.

ब्रिटनचा ड्यूक ऑफ डचेस ऑफ ससेक्स प्रिन्स हॅरी आणि हॉलिवूड अभिनेत्री मेगन मार्कल यांच्या घरी गत ६ मे रोजी पुत्ररत्न जन्मास आले. या रॉयल बेबीची एक झलक पाहण्यास प्रत्येकजण उत्सुक होता. त्यामुळे शाही कुटुंबाने रॉयल बेबीचे अधिकृत फोटो शेअर केलेत. या फोटोत प्रिन्स हॅरी, मेगन व रॉयल बेबी असे तिघेही आहेत. मेगन व्हाईट ड्रेसमध्ये तर प्रिन्स हॅरी ग्रे कलरचा सूट-पॅन्टमध्ये दिसतोय. प्रिन्स हॅरीने आपल्या चिमुकल्याला छातीशी कवटाळलेले आहे.

मेगन,प्रिन्स हॅरी बाळासह विंडसर कॅसलमधील सेंट जॉर्ज हॉलमध्ये आलेत आणि मीडियाचे कॅमेरे त्यांच्यावर रोखले गेलेत. याच सेंट जॉर्ज हॉलमध्ये वर्षभरापूर्वी मेगन व प्रिन्स हॅरीच्या लग्नाचे जंगी रिसेप्शन पार पडले होते.

यावेळी रॉयल बेबीचे नावही जाहीर करण्यात आले. ब्रिटनच्या राजघराण्याच्या गादीचा सातवा दावेदार म्हणून जन्मास आलेल्या या रॉयल बेबीला ‘आर्ची’ नावाने ओळखले जाईल. त्याच्या नावापुढे आर्ची हॅरिसन माऊंट बेटन विंडसर हे विशेषनामही जोडण्यात येईल.

बाळाला कवेत घेतलला प्रिन्स हॅरी आणि त्यांच्याकडे कौतुकाने बघणारी मेगन, हा क्षण सगळ्यांसाठीच कुतुहलाचा क्षण होता. हॅरी व मेगनच्या चेहऱ्यावरीला आनंद सगळे काही सांगणारा होता. यावेळी दोघांनीही बाळाच्या जन्मासाठी सदिच्छा देणाऱ्यांचे मनापासून आभार मानलेत.गतवर्षी १९ मे रोजी प्रिन्स हॅरी व मेगन यांचा शाही विवाह पार पडला होता. या शाही लग्नामध्ये सुमारे ८४ मिलियन पाउंड (७८७ कोटी रुपये) खर्च केले गेले होते. लग्नापूर्वी प्रिन्स हॅरीला ड्यूक ऑफ ससेक्स या उपमेने गौरविले गेले होते

टॅग्स :मेगन मार्केलप्रिन्स हॅरी-मेगन शाही विवाह