Join us
Daily Top 2Weekly Top 5

मी तुझा झालोयं...आपण ७० व्या वर्षीही सोबत असू...! जस्टीन बीबरने मंगेतर हॅलीला दिले वचन!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 11:45 IST

बाहमास येथील ट्रीपदरम्यान २४ वर्षांच्या जस्टीनने २१ वर्षांच्या हॅलीला सर्वांदेखत रिंग घातली आणि ही खबर वाऱ्यासारखी पसरली. या ट्रीपचे काही फोटोही व्हायरल झालेत. 

पॉपस्टार जस्टीन बीबर याने कोट्यवधी तरूणींचे हृदय तोडत साखरपुडा केला. गत ७ तारखेला गर्लफ्रेन्ड हॅली बाल्डविनसोबत तो एन्गेज्ड झाला. जस्टीन व हॅली २०१६ पासून एकमेकांना डेट करत होते. मध्ये दोघांच्या ब्रेकअपची बातमीही आली होती. पण नंतर पुन्हा दोघे जवळ आलेत आणि आता दोघांचा साखरपुडाही झाला. बाहमास येथील ट्रीपदरम्यान २४ वर्षांच्या जस्टीनने २१ वर्षांच्या हॅलीला सर्वांदेखत रिंग घातली आणि ही खबर वाऱ्यासारखी पसरली. या ट्रीपचे काही फोटोही व्हायरल झालेत. या फोटोंमध्ये हॅलीच्या बोटात रिंग दिसतेय. यानंतर स्वत: जस्टीननेचं या साखरपुड्याच्या बातमीला अधिकृत दुजोरा दिला.

‘काहीही जाहीर करण्यापूर्वी मला थोडी प्रतीक्षा करायची होती. पण गोष्टी लपून राहत नाहीत. हॅली ऐक, मला तुझ्याशी जुळलेल्या प्रत्येक गोष्टीवर प्रेम आहे. मी अख्खे आयुष्य तुझ्यासोबत घालवू इच्छितो. मी वचन देतो की, मी आपल्या अख्ख्या कुटुंबाचा पूर्ण सन्मानासह सांभाळ करेल आणि आपल्या प्रत्येक निर्णयात जीजसच्या पवित्र आत्म्याने दिलेल्या निर्देशांचे पालन करेल. माझे हृदय तुझे झालेय आणि तू माझ्यासाठी माझ्यापेक्षाही मोठी आहेत. तू माझे प्रेम आहेत. तुझ्याशिवाय अन्य कुणासोबतही मी माझे आयुष्य घालवू इच्छित नाही. तू मला अधिक चांगली व्यक्ती होण्यास मदत केलीस. तू सोबत आहेस, आता मला सगळे काही ठीक वाटतेय. मी एका गोष्टीसाठी सर्वाधिक उत्सूक आहे. ती म्हणते, माझ्या लहान भावंडांना एक स्थायी आणि सुखी लग्न बघायला मिळेल. त्यांनाही यापासून प्रेरणा मिळेल. परमेश्वराने योग्य वेळ साधलीय. आपण सातव्या महिन्याच्या सात तारखेला साखरपुडा केला. सात क्रमांक शुभ असतो. मी हे प्लान केले नव्हते. पण माझ्या गुडनेसला (हॅली) भविष्य सुरक्षित करायला आवडतं. वयाच्या सत्तरीतही आपण असेच आनंदी राहू. ज्याला एक चांगली पत्नी मिळते, त्याचे सगळे काही चांगले होते. परमेश्वराचा आशीर्वाद मिळतो. हे वर्ष आशीर्वादाचे आहे,’ असे जस्टीनने लिहिले आहे.हॅलीनेही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘मला ठाऊक नाहीत की, मी आयुष्यात कुठली चांगली कामे केलीत, जे मला इतका चांगला व्यक्तीसोबत आयुष्य घालवण्याची संधी मिळालीय. मी परमेश्वराचेचं आभार मानेल,’ असे तिने लिहिली आहे.