Justin Bieber and Halley Baldwin Engaged? | जस्टीन बीबर व हॅली बाल्डविन एन्गेज्ड?
जस्टीन बीबर व हॅली बाल्डविन एन्गेज्ड?

पॉप स्टार जस्टीन बीबर आणि टेलिव्हिजन सेलिब्रिटी हॅली बाल्डविन यांच्या प्रेमाच्या चर्चा दीर्घकाळापासून येत आहे. आता हे लव्ह बर्ड्स एन्गेज्ड झाल्याची खबर आहे.
होय, टीएमझेड टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, गत शनिवारी बाहमास येथे एका स्थानिक रेस्टॉरंटमध्ये जस्टीनने गर्लफ्रेन्ड हॅलीसोबत साखरपुडा उरकला. हे केवळ जस्टीनच्या चाहत्यांसाठीचं नाही तर हॅलीसाठी सुद्धा मोठे सरप्राईज होतं.
एका प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने आलेल्या वृत्तानुसार, रेस्टॉरंटमधील गर्दी साल्सा करण्यात रंगली असताना जस्टीनच्या सुरक्षारक्षकांनी अचानक, या गर्दीतील प्रत्येकाकडून त्यांचे फोन काढून घेतले. आता काहीतरी एक्साईटींग घडणार आहे, असे गर्दीला सांगण्यात आले. गर्दीतील लोकांची उत्सुकताही ताणली गेली आणि या अशा वातावरणात जस्टीनने गर्लफ्रेन्ड हॅलीला प्रपोज करत तिच्या बोटात रिंग घातली. अद्याप जस्टीन वा हॅली यांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.पण जस्टीनचे वडील जेरेमी बीबर यांनी जस्टीनचा फोटो पोस्ट करत याबद्दलचे संकेत दिलेत. Proud is an understatement! Excited for the next chapter!, असे त्यांनी लिहिले.  

जस्टीन बीबरची तरूणाईत प्रचंड के्रझ आहे. त्याची सगळी गाणी लोकप्रीय आहेत. पण विशेषत: बेबी, लव्ह युवरसेल्फ, से सॉरी, वॉट डू यू मीऩ लेट मी लव्ह यू ही गाणी तुफान गाजलीत. हॅलीला डेट करण्यापूर्वी जस्टीन बीबर सेलेना गोमेज हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होता,अर्थात तीन वर्षांपूर्वी त्यांचे ब्रेकअप झाले.

२४ वर्षांचा जस्टीन अणि २१ वर्षांची हॅली हे दोघेही २००९ मध्ये पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते, असे मानले जाते. यानंतर २०१४ मध्ये या दोघांच्या डेटींगची चर्चा झाली. पण त्यावेळी दोघांनीही ही चर्चा नाकारली होती. २०१६ मध्ये जस्टीन हॅलीसोबत हॉलीडेवर गेला आणि पुन्हा त्याच्या डेटींगची चर्चा सुरू झाली. याचदरम्यान जस्टीन पुन्हा त्याची पूर्वीची गर्लफ्रेन्ड सेलिनाजवळ गेल्याचेही ऐकीवात आले. पण महिनाभरापूर्वी जस्टीन व हॅलीच्या रिलेशनशिपची चर्चा नव्याने सुरू झाली.


Web Title:  Justin Bieber and Halley Baldwin Engaged?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.