Join us

Oscars 2020 : पर्समध्ये टर्की सँडविच घेऊन ऑस्कर सोहळ्यात पोहोचली ज्युलिया बटर्स , सगळेच झाले थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 15:24 IST

Oscars 2020 : ऐकावे ते नवल!

ठळक मुद्देज्युलियाने काम केलेल्या ‘वन्स अपॉन टाइम इन हॉलिवूड’ या सिनेमाने दोन ऑस्कर जिंकले.

यंदाचा ऑस्कर सोहळा नुकताच पार पडला आणि नेहमीप्रमाणे वेगवेगळ्या कारणांनी गाजला. ऑस्कर पुरस्कारांची तर चर्चा झालीच. पण ऑस्करच्या रेड कार्पेटवर दिसलेल्या हॉलिवूड स्टार्सचीही चर्चा रंगली. आता हेच बघा ना, ‘वन्स अपॉन टाइम इन हॉलिवूड’ या सिनेमाची 11 वर्षीय अभिनेत्री ज्युलिया बटर्स तिच्या पर्समध्ये सँडविच घेऊन ऑस्कर पुरस्कारात सहभागी झाली. होय, आश्चर्य वाटले ना. पण हे खरे आहे. ऑस्कर अवॉर्ड सोहळ्यात सहभागी होणा-या प्रत्येकाला पिज्जा व पॉपकॉर्नसारखे स्नॅक्स मिळतात. पण याऊपरही ज्युलिया स्वत:साठी घरून सँडविच घेऊन आली. ते सुद्धा पर्समध्ये. पिंक कलरच्या ड्रेसमध्ये ज्युलिया रेड कार्पेटवर अवतरली.

यावेळी तिच्या हातात एक सुंदर पिंक कलरचीच पर्स होती. या पर्समध्ये काय आणलेस? असा प्रश्न तिची ती सुंदर पर्सपाहून मीडियाने तिला केला. यावेळी ज्युलियाने चक्क पर्स उघडून त्यातील टर्की सँडविच दाखवले. 

मी पर्समध्ये टर्की सँडविच आणलेय. खरे तर मी शाकाहारी लोकांची माफी मागते. पण इथे दिले जाणारे स्रॅक्स मला जराही आवडत नाहीत. म्हणून मी टर्की सँडविच आणलेय, असे सांगत तिने पर्स उघडून दाखवली. तिच्या पर्समधील टर्की सँडविच बघून सगळेच अवाक झालेत.सध्या ज्युलियाच्या या सँडविचची सोशल मीडियावर खमंग चर्चा रंगली आहे.ज्युलियाने काम केलेल्या ‘वन्स अपॉन टाइम इन हॉलिवूड’ या सिनेमाने दोन ऑस्कर जिंकले. 10 कॅटेगरीमध्ये या सिनेमाला नॉमिनेशन मिळाले होते.    

टॅग्स :ऑस्करहॉलिवूड