Join us
Daily Top 2Weekly Top 5

हॉलिवूड अभिनेत्री सोंद्रा लॉकेचे निधन, सहा आठवड्यांनंतर झाला खुलासा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 16:12 IST

सोंद्रा यांचे वय मृत्यूवेळी ७४ वर्षे होते.  १९६८ मध्ये आलेल्या ‘द हार्ट इज ए लोनली हंटर’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सोंद्राला आॅस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.

ठळक मुद्देक्लाइंट ईस्टवूडसोबत सोंद्राने सहा चित्रपटांत काम केले होते. १९६७ मध्ये अभिनेता गॉर्डन एंडरसनसोबत सोंद्राने लग्न केले.

दिग्गज हॉलिवूड अभिनेत्री व दिग्दर्शिका सोंद्रा लॉकेचे निधन झाले. द असोसिएटेड प्रेसला प्राप्त झालेल्या मृत्यू प्रमाणपत्रानुसार, सोंद्रा यांचे निधन गत ३ नोव्हेंबरला लॉस एंजिल्स येथे त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराचा धक्का व हाडांच्या कर्करोगाने झाले. पण त्यांच्या मृत्यूची बातमी काल गुरूवारी पहिल्यांदा प्रकाशित झाली. सर्वप्रथम रडार आॅनलाईनने त्यांच्या निधनाचे वृत्त दिले. त्यापूर्वी कुणीही सोंद्राच्या मृत्यूची बातमी दिली नाही. मृत्यूची बातमी प्रकाशित करण्यास सहा आठवडे का लागले, हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे.

सोंद्रा यांचे वय मृत्यूवेळी ७४ वर्षे होते.  १९६८ मध्ये आलेल्या ‘द हार्ट इज ए लोनली हंटर’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सोंद्राला आॅस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. क्लाइंट ईस्टवूडसोबत सोंद्राने सहा चित्रपटांत काम केले होते. १९६७ मध्ये अभिनेता गॉर्डन एंडरसनसोबत सोंद्राने लग्न केले.

टॅग्स :हॉलिवूड