Join us

निक जोनसच्या आईला बघाल तर प्रियंकाला विसराल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 13:36 IST

काही दिवसांपूर्वी निक प्रियंकाच्या आईला भेटायला भारतात आला होता. अशात आता निक जोनसच्या आईचे काही फोटो व्हायरल झाले आहे. 

(Image Credit : Times Now)

मुंबई : अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अमेरिकन गायक-अभिनेता निक जोनस यांच्या अफेअरबाबत आता कुणाला माहीत नसेल असा क्वचितच कुणी असेल. दोघांच्या लग्नाच्याही चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वी निक प्रियंकाच्या आईला भेटायला भारतात आला होता. अशात आता निक जोनसच्या आईचे काही फोटो व्हायरल झाले आहे. या फोटोंवरुन प्रियंकाची सासू प्रियंकापेक्षाही सुंदर असल्याची चर्चा होत आहे.

निक जोनसची आई डेनिस मिलर जोनसची तुलना प्रियंका चोप्रासोबत केली जात आहे. डेनिसी मुळची ही टेक्सासची राहणारी आहे. डेनिसीने १९८७ मध्ये निकचे वडील आणि गायक पॉल केविन जोनस सिनिअरसोबत लग्न केलं होतं. लग्नावेळी ती केवळ १९ वर्षांची होती. इतकेच नाही तर ती २१ व्या वर्षांची असताना आई झाली होती. 

निक जोनसच्या जन्मावेळी त्याची आई केवळ २६ वर्षांची होती. निकने त्याच्या आईसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. एकदा निकचा भाऊ केविन याने सांगितले होते की, प्रियंका त्याच्या घरच्यांना पसंत आहे. पण अजून निकच्या आईची प्रियंकाबाबत काहीही प्रतिक्रिया कळाली नाहीये. पण निकची आई प्रियंकापेक्षाही सुंदर आहे याची चर्चा मात्र चांगलीच रंगली आहे. 

टॅग्स :निक जोनासप्रियंका चोप्राहॉलिवूड